राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा, प्राचार्य कविता पोरेड्डीवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार

0
12

गडचिरोली, दि.२5 :नगर परिषद निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. प्राचार्य कविता सुरेश पोरेड्डीवार यांचे ना नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले.

येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांनी आज पत्रकार परिषदेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वासेकर, ज्येष्ठ नेते डॉ.हेमंत अप्पलवार, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ बोरकुटे, प्राचार्या कविता पोरेड्डीवार, सोनाली पुण्यप्रेड्डीवार यांच्यासह उमेदवार उपस्थित होते. सुरेश सावकार पोरेड्डीवार म्हणाले की, आपण यापूर्वी सत्तेत असताना दिवंगत आर.आर.पाटील यांच्या प्रयत्नाने गडचिरोली शहराला मोठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. शहराच्या विकासातही मोठी भर घातली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राचार्य कविता पोरेड्डीवार म्हणाल्या की, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी चांगली ड्रेनेज सिस्टीम, स्वच्छतेचे उपक्रम आणि आरोग्यविषय सुविधा निर्माण करण्यावर आपण भर देऊ. मुले, वृद्धांसाठी पार्क निर्माण करुन सर्वांच्या हितासाठी चांगले निर्णय घेऊ, असेही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी विविध वॉर्डातील उमेदवारांची घोषणा केली.नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ म.ज्योतिबा फुले प्रभागातून अनुसूचित जाती(सर्वसाधारण)-मनिषा अनिल खेवले, तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेच्या जागेवर ममता प्रमोद चिलबुले यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक २ लांझेडा प्रभागातून नामाप्रच्या जागेवर निशांत लक्ष्मणराव पापडकर, तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर आशा किशोर जुवारे यांना अधिकृत उमेदवारी बहाल करण्यात आली. प्रभाग क्रमांक ३ स्नेहनगर प्रभागात नामाप्रच्या जागेवर प्रमोद शरद वरगंटीवार, तर सर्वसाधारण महिलेच्या जागेवर नयना अरुण पेंदोरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. प्रभाग क्रमांक ४ रामनगरमध्ये अनुसूचित जमाती- योगेश रमेश मडावी, सर्वसाधारण महिला- विद्या दीपक सातपुते, प्रभाग क्रमांक ५-छत्रपती शाहूनगरमधून अनुसूचित जाती(महिला)-रेखा अरविंद ढवळे, सर्वसाधारण-रवींद्र नानाजी निंबोरकर, प्रभाग क्रमांक ६- कॅम्प एरियामध्ये नामाप्र(महिला)-मीना घनश्याम दिवटे व सर्वसाधारण- दादाजी सीताराम चुधरी, प्रभाग क्रमांक ७ गणेशनगरमधून अनुसूचित जाती(महिला)-शारदा देवेंद्र दामले, अनुसूचित जमाती(सर्वसाधारण)-विठ्ठल खुशाल कुमरे, प्रभाग क्रमांक ८ म.गांधी प्रभागमधून नामाप्र(महिला) जागेवर दुर्गा सुनील मंगर व सर्वसाधारण- अजय गजानन कुंभारे, प्रभाग क्रमांक ९ हनुमाननगर प्रभागातून नामाप्र(महिला)-वैशाली मनोहर गेडाम, सर्वसाधारण- रमेश शंकर बारसागडे, प्रभाग क्रमांक १० विसापूरमधून अनुसूचित जमाती(महिला)-पुष्पा रुमचंद कुमरे, नामाप्र-नानाजी मारोती पाल, प्रभाग क्रमांक ११ सोनापूरमध्ये अनुसूचित जमाती(महिला)-जामिनी मंगलदास कुलसंगे, सर्वसाधारण- लक्ष्मण विश्वनाथ घोंगळे, प्रभाग क्रमांक १२ गोकुळनगरमधून अनुसूचित जाती(सर्वसाधारण)-जगन्नाथ जांभूळकर, नामाप्र(महिला)-रेखा प्रभाकर बारापात्रे, तर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर रोहिणी रामचंद्र वाढई यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.