देसाईगंजमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ३, तर नगरसेवक पदासाठी ३६ नामनिर्देशन पत्रे सादर

0
11

देसाईगंज, दि.२५: १८ डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज नगराध्यक्षपदासाठी ३, तर नगरसेवक पदासाठी ३६ नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली.दरम्यान  (दि.२५) नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. असे असतानाही राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी, तसेच नगरसेवकपदासाठीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा न केल्याने इच्छूक उमेदवार संभ्रमात पडले आहेत.  ऐनवेळी घोषणा करून पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी ही खेळी खेळल्याचे सांगितले जात आहे.

नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे नगर परिषदेच्या विद्ममान सभापती शालू दंडवते यांनी आपला नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर नान्हे यांच्याकडे सादर केला. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, तालुकाध्यक्ष राजू जेठानी, पंचायत समितीच्या सभापती प्रीती शंभरकर, बबलू हुसैनी उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीतर्फे बिजली सहारे व भाजपातर्फे सुनंदा सपाटे यांनीही नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज सादर केला.

नगरसेवक पदासाठी प्रभाग १ अ मध्ये ३, १ ब मध्ये २, प्रभाग २ अ मध्ये २, ब मध्ये २, प्रभाग ३ अ मध्ये १, ३ ब मध्ये ३, प्रभाग ४ अ मध्ये २, ब मध्ये ४, प्रभाग ५ ब मध्ये १, प्रभाग ६ अ मध्ये ४, ६ ब मध्ये १, प्रभाग ७ अ मध्ये १, ७ ब मध्ये २, प्रभाग ८ अ मध्ये २, ८ ब मध्ये २, प्रभाग ९ अ मध्ये २ तर ९ ब मध्ये २ असे एकूण ३६ नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्यात आले.