अर्जुनी-मोरगावात तालुकास्तरीय महामेळावा शनिवारी

0
9

अर्जुनी मोरगाव दि. 25: भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४० व्या कलमानुसार ओबीसींना त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी घटनात्मक दर्जा मिळाला आहे. परंतु ओबीसींना तेवढ्या सोयी-सवलती मिळत नाही. त्यामुळे विविध ओबीसी संघटनांनी एकत्र येवून शासनाविरूद्ध एल्गार पुकारला आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी सेवा संघाद्वारे ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा अंतर्गत संविधान दिनाच्या पर्वावर अर्जुनी मोरगाव येथून ओबीसी जनचेतना रथ यात्रेचा शुभारंभ शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी ११ वाजता ओबीसी समाज बांधवांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व ओबीसी बंधू भगिनींनी या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अर्जुनी मोरगाव तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीने केला आहे.

ओबीसी जनचेतना रथयात्रा शुभारंभ व महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, प्रा. बबनराव तायवाडे, खा. नाना पटोले, आ. विजय वडेट्टीवार, आ. बाळा काशिवार, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, बंडु सावरबांधे, विजय शिवणकर,मनोज चव्हाण, बबलू कटरे,खेमेंद्र कटरे,मनोज मेंढे,अमर वराडे,शिशिर कटरे,कैलास भेलावे,सावन डोये प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४० व्या कलमानुसार ओबीसींना त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी घटनात्मक दर्जा मिळाला आहे. भारतीय संविधानाच्या कलम ३४०, १५ (४), १६ (४) दुसऱ्या राष्ट्रीय ओबीसी मंडळ आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार व केंद्र शसनाने मान्य केल्यानुसार देशातील सर्वधर्म समावेशक ५२ टक्के ओबीसी वर्गासाठी सरकारी नोकरी व शिक्षणात २७ टक्के राखीव जागेची, शिक्षणात शंभर टक्के शिष्यवृत्ती व फ्रिशीपची योजना लागू झाली. स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानी व संविधान निर्मितीच्या ६६ वर्षानंतर अजूनही संवैधानिक हक्कापासून ओबीसी वंचित आहे. ५२ टक्के ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. या देशाचा एकूण उत्पादनात ओबसींचा ९० टकके श्रम खर्च झालेला असताना ओबीसींच्या वाट्याला फक्त १३ टक्के शेतजमीन, ६ टक्के नोकऱ्या आणि ३ टक्के संपत्ती एवढ्यावरच त्यांना थांबावे लागले आहे. ओबीसींचा वाटा ओबीसींना मिळावा.

घटनेच्या ३४० व्या कलमान्वये आम्हाला आमचे अधिकार मिळवून घ्यायचे आहे. आमच्या पूर्वजांनी संविधान वाचला नाही. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळले नाही. ‘शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ याचा अर्थ कळला नाही. म्हणूनच ओबीसींवर ही वेळ आली आहे . ओबीसींच्या न्याय व हक्कासाठी आता ओबीसी जागृत होणे काळाची गरज असून त्यासाठी आंदोलनाची गती तीव्र करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी अर्जुनी मोरगाव येथे आयोजित केलेल्या ओबीसी महामेळावा व जनतेने रॅलीला मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष कृती समितीने केले आहे.

ओबीसी जनचेतना रॅली व ओबीसी महामेळावा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील प्राचार्य यशवंत परशुरामकर, मुकेश जायस्वाल, विजय कापगते, उद्धवराव मेहेंदळे, नवीन नशिने, राधेशाम भेंडारकर, गिरीष बागडे, गजानन डोंगरवार, प्रकाश गहाणे, भालचंद्र पटले, ओमप्रकाश पवार, किशोर तरोणे, प्रमोद लांजेवार, ललीत बाळबुद्धे, लोकेश उकरे, डॉ. उल्हास गाडीगोणे, प्रा. सुनिता हुमे, प्रमोद पाऊलझगडे, शाम कापगते, गौरीशंकर अवचटे, सुशीला हलमारे, दिनदयाल डोंगरवार, तेजराम राऊत व तालुक्यातील ओबीसी बांधव सहकार्य करीत आहेत.