युवा स्वाभीमानच्यावतीने जिल्ह्यात रुग्णवाहिका

0
8

गोंदिया,दि.१३-युवा स्वाभिमान संघटना गोंदिया जिल्ह्याकरिता जिल्ह्यातील गोरगरीब,अल्पभूधारक व सर्वसामान्य रुग्णांना रुग्णालयात पोचविण्यासाठी युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आले.यावेळी गोंदिया जिल्हाध्यक्ष जितेश राणे,उपाध्यक्ष टोकेश हरिणखेडे,सचिव जीवन शरणागत,राजेश बडोले,नीलेश बोपचे,मुकुंदराव बडोले,नरेंद्र बागडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी युवा स्वाभीमानच्यावतीने सामाजिक कार्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या.तर आ.रवी राणा यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी युवा स्वाभिमान संघटनेसोबत सदैव असल्याची ग्वाही देत युवकांना संघटनेशी जोडण्याचे आवाहन केले.ही रुग्णवाहिका निःशुल्क राहणार असून फक्त डिझेलचा खर्च रुग्णाच्या कुटुंबांना द्यावयाचा असून जिल्ह्यातील कुठल्याही ठिकाणावरून फोन आल्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी पत्रपरिषदेत दिली.सोबतच रुग्णवाहिकेसाठी संयोजक प्रा.सुनील वाघमारे९८२३५८१६७२,टोकेश हरिणखेडे ९४०४८४३९९६,जीवन शरणागत ९४०४०२९६२३ या क्रमांकावर संपर्क करता येणार असल्याचे सांगितले.युवा स्वाभिमान शेतकरी शेतमजुरासंह सर्वसामान्य नागरिकासांठी सतत लढा देणार असून धानाचा चुकारा व बोनस वेळेच्या आत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.सोबतच येत्या गोंदिया नगरपरिषदेच्या निवडणुकीत युवा स्वाभिमान सहभागी होणार असल्याची माहिती दिली.