नगरसेवक ६ व अध्यक्षाचा पदासाठी २ नामांकन दाखल

0
11

गोंदिया ,दि.१३:- गोंदिया नगर परिषदेच्या २१ प्रभागासाठी होत असलेल्या निवडणुकीत एकूण ४२ नगर परिषद सदस्यांच्या पदासाठी व नगराध्यक्ष पदासाठी येत्या ८ जानेवारी रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी नऊ डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र देणे व घेणे सुरू झाले आहे. १३ डिसेंबरला नगरसेवकांसाठी ६ अर्ज नामांकन दाखल करण्यात आले तर अध्यक्षपदाकरिता २ अर्ज दाखल करण्यात आले. अध्यक्षपदाकरिता अपक्ष म्हणून पंकज सुंदरलाल यादव व सतीश सदाराम बनसोड यांनी अर्ज नामांकन दाखल केले आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम दिनांक १७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत तसेच नामदर्शक पत्र छाननी व यादी प्रसिद्धी १९ डिसेंबर सकाळी ११ वाजतापासून सुरू होणार आहे. व नामदर्शक पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख १९ डिसेंबर दुपारी ३ वाजतापर्यंत असणार तसेच मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी २ जानेवारी करण्यात येणार असून मतदानाचा हक्क बजावण्याकरीता ८ जानेवारी सकाळी ७:३० ते ५:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच मतांची मोजणी ९ जानेवारी सकाळी १० वाजतापासून सुरू होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम संपली असता सर्वांची नजर आता नगर परिषदेच्या निवडणुकीवर आहे. यंदा शहरातील एक प्रभाग वाढवून घेत २१ प्रभाग करण्यात आले असून चार ऐवजी दोन सदस्यांच्या एक प्रभाग करण्यात आला आहे. शिवाय नगर अध्यक्ष आता थेट जनतेलाच निवडायचा असल्याने शहरवासीयांचे उत्सुकता अधिकच वाढली आहे. नगराध्यक्ष पदासाठीही आजी-माजींसोबतच नवसंख्यांची नावे पुढे येत आहे. आता निवडणुकीला जेम-तेम एकच महिना उरला असल्याने इच्छुकांनी धावपळ वाढली आहे. त्यात राजकीय पक्षांच्या तिकिटासाठीही सेटिंग सुरू आहे. निवडणुकीला घेऊन इच्छुकांनी धावपळ सुरू असतानाच एका राजकीय पक्षाला ४२ उमेदवार रिंगणात उतरवायचे असल्याने पक्षांचीही दमछाक होत आहे. तर यासोबतच निवडणुकीला घेऊन नगर परिषद कर्मचारीही धावपळीला लागले आहेत.