तिरोडा नगराध्यक्षपदासाठी 16 अर्ज,राँकाच्या ममता बैस व भाजपच्या देशपांडेतच होणार लढत

0
10

गोंदिया,दि.18 : गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेच्या रणसंग्रमात अखेरच्या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमधील संभावित आघाडी फिस्कटली. एवढेच नाही तर भाजप-शिवसेनेतही समझोता होऊ शकला नाही. कोणता वॉर्ड कोणासाठी सोडायचा यावर एकमत न झाल्यामुळे युती-आघाडीतील चारही प्रमुख पक्षांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना उभे करण्याचा निर्णय घेतला.गोंदियात नगराध्यक्षपदासाठी ३८ उमेदवारांनी ५२ नामांकन दाखल केले. तसेच ४२ नगरसेवकांच्या जागांसाठी २७७ नामांकन आले. तिरोड्यात नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारांनी १६ नामांकन दाखल केले.

तिरोडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगर सेवक पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकच गर्दी झाल्याचे बघावयास मिळाले तिरोडा नगर पालीकेचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिला गटासाठी राखीव आहे. या पदासाठी भारती जनता पक्षाकडून सोनाली देशपांडे, राष्टÑवादी काँग्रेसकडून ममता बैस, भारतीय राष्टÑीय काँग्रेसकडून ममता दुबे तर बहुजन समाज पक्षाच्यावतीने पोर्णिमा मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजप कडूनच वनमाला डहाके यांचाही अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आहे. मात्र भाजनपचे श्रीमती देशपांडे यांना उमेदवारी जाहिर निष्ठावानात नाराजी असून आरएसएसचा भाजपमध्ये वाढत चाललेला हस्तक्षेप बहुजन समाजासोबतच इतर खुल्या वर्गासाठी अन्यायकरणारा नेहमी असते बोलले जात आहे.कांँग्रेस व अपक्ष म्हणून नंदा सुधीर वासनिक,बसपकडून सुनिता सिध्दार्थे निकोसे,अपसाना बेगम परवेज अक्तर सैय्यद अपक्ष,वंदना बडगे ,प्रीती चव्हाण अपक्ष,बबीता बर्वेकर बसपा आदींनी अर्ज दाखल केले आहे.

दाखल झालेल्या नामांकनाची स्क्रुटनी १९ ला होणार आहे. तर नामांकन मागे घेण्याची मुदत २९ पर्यंत आहे. त्यानंतर वॉर्डांमधील रणसंग्राम सुरू होणार आहे