मदत निधी नको, अग्नीशमन विभागाला निधी द्या

0
22

मृतांच्या कुटुंबीयांचा सल्ला : जिल्हा पÑशासनच दोषी असल्याचा आरोप

खेेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.22 : शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौकात बुधवारी घडलेल्या अग्नीकांडानंतर नगर परिषदेच्या अग्नीशामक विभागाच्या कार्यकुशलतेचे वाभाडे जनतेसमोर आले. अवघ्या अर्धा किमिटर अंतरावर असलेल्या अग्नीशमन विभागाच्या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचायला अर्धा तास लागला. पोहोचल्यानंतरही सुसज्ज यंत्रणेअभावी आग आटोक्यात आणण्याऐवजी अग्नीशमन विभागाचे कर्मचारी पंगू झालेले दिसून आले. तीस किलोमिटर वरील अदानी वीज पÑकल्पातील अग्नीशामक दलाच्या गाड्या पोहोचल्यानंतर कुठे आगीवर नियंत्रण आणण्याच्या कामाला सुरवात झाली. अदानीच्या गाड्या वेळेच्या आत आल्या नसल्या, तर बहुतांश गोरेलाल चौकातील घरे व दुकाने या अग्नीतांडवात नष्ट झाली असती. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मृताच्या कुटुंब्यिांना मदत देण्यापेक्षा गोंदिया नगर पालिकेच्या अग्नीशमन विभागाला सुसज्ज करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी भूमिका या अग्नीकांडातील मृतांचे नातेवाईक असलेल्या अजमेरा कुटुंबीयांनी व्यक्त केली. तसेच या अग्नीकांडाला जिल्हा पÑशासन संपुर्णत: जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हॉटेल बिंदलला आग लागल्याचे लक्षात येताच आग वीजविण्यासाठी अजमेरा कुटूंबियांनी गोंदिया शहर पोलिस आणि अग्निशामक विभागाला फोन करून माहिती दिली. माहिती दिल्याच्या अर्ध्या तासानंतर अग्नीशामक वाहन घटनास्थळावर पोहोचले. तर दोनशे मिटरवर असलेल्या पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी उशिरा पोहोचले. गोंदिया अग्निशामक विभागाकडे बचाव कार्य करण्यासाठी पुरेसे साधन सामुग्री उपलब्ध असते, तर आगीत होरपळून जळालेल्या लोकांना वाचविता आले असते. जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी घटनास्थळ आणि मृतांच्या कुटुंबियांची भेट घेवून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पÑत्येकी दोन लाख रुपये मदतनिधी जाहीर केली. त्यावर मृतांचे कुटुंबिय अजमेरा यांनी मृतांच्या कुटुंबियांना मतदनिधी देण्यापेक्षा तो निधी पालिकेला द्यावा. त्यातून अग्नीशमन विभागाला अधीक कुशल आणि कार्यतत्पर करावे, असा सल्ला दिला.
गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वासला असून जिल्याला तीन राज्याच्या सीमा लागून असल्याने .या ठिकाणी नेहमीच अस्थायी प्रवास्यांची वर्दळ पाहायला मिळते. तर गोंदिया शहराच्या मुख्य बाजार पेठेतून रेल्वे मार्ग जात असल्याने शहराच्या मुख्य बाजार पेठेत अनेक व्यवसायिकांनी हाटेल आणि लाजिग रेस्टारेंट थाटून ठेवले आहे .मात्र काल घडलेल्या घटनेमुळे अनेक हाटेल आणि लाज मालकासोबतअसलेल्या अधिकाºयांचे पितळ उघडे झाले आहे .हॉटेल आणि लॉजला लागणारी परवानगी शहरातील एकाही लॉज व हॉटेल मालकांनी घेतली नसल्याचेच समोर येत आहे. शहरातील बहुतांश हाटेल हे गल्ली कोपºयात असल्याने त्याठिकाणी फायरची सुरक्षा नाही. त्यातच घटना घडलेल्या हाटेल बिंदल प्लाझामध्ये एकच एक्झीटदार असल्याचे समोर अले. त्या एका दारामुळे बचावकार्य करताना अग्नीशमक विभाग अणि पोलिसांना कमालीची कसरत करावी लागली.
या घटनेनंतर गोंदिया शहरातील हॉटेल्स आणि लॉजिंगला असलेल्या परवानगीबाबत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना विचारणा केली असता गोंदिया शहरातील २-३ हाटेल आणि लाज रेस्टारेंट वगळता इत्तर कुठल्याही हाटेल व्यावसायिकांना हाटेल आणि लाज चालविण्याची परवानगी नसल्याचे सांगतीले. हॉटेल बिंदल प्लाझाच्या परवानगी संदर्भातही त्यांनी शंका व्यक्त केली. या घटनेमुळे गोंदिया शहरात असलेल्या लॉज अणि हॉटेलच्या परवानगीचा विषय चव्हाट्यावर आला आहे. हे हॉटेल आणि लॉजविनापरवाना वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने चालत आहेत. त्यावरून महसूल विभाग, पोलिस विभाग व नगर परिषद विभागाच्या अधिकाºयांशी संगणमत करून हा व्यवसाय फोफावल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर तरी पÑशासन चिरीमिरी व गैरव्यवहाराला बाजूला सारत विनापरवानगी चालणाºया हॉटेल व लॉजवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार काय ? असा पÑश्न विचारला जावू लागला आहे.

आगीचे रहस्य कायम?
बुधवारी पहाटे हॉटेलला आग लागली. अग्नीशमन विभागाने आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट पÑयत्न केला. मात्र, आज गुरुवारी देखील आगीची धग सौम्यर्त्यिा कायम आहे. ठिकठिकाणाहून स्लॅब कोसळत आहे. त्यामुळे हॉटेलच्या जळालेल्या खोल्यांमध्ये पÑवेश करता येत नाही. पोलिसांनी आतमध्ये जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे आगीचे रहस्य अद्यापही कायम आहे.

डॉक्टर दाम्पत्यांचे दैव बलवत्तर
आगीत भस्मसात झालेल्या हॉटेल बिंदल प्लाझामध्ये मध्यपÑदेशातील लिंगा या गावचे डॉ. अमृत व संतोषी रक्षिया खोली कÑमांक ३०२ मध्ये थांबले होते. मात्र, त्यांना पुढच्या पÑवासाकरिता पहाटे चार वाजता रेल्वेगाडी असल्यामुळे त्यांनी पहाटे साडेतीन वाजता हॉटेल सोडले. आग पावणेचार वाजताच्या सुमारास लागली. त्यामुळे दोन्ही दाम्पत्याचे दैव बलवत्तर होते, असेच म्हणावे लागेल.