प्रगतीबरोबरच शिस्त आवश्यक- अभिमन्यू काळे

0
17

गोंदिया,दि.२६ : रस्ता सुरक्षेचे महत्व विशद करणारे प्रशिक्षण राज्यात केवळ सातारा जिल्ह्यातच देण्यात येत होते. मात्र गोंदिया सारख्या दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्ह्यात देखील हे प्रशिक्षण होत आहे ही आनंदाची बाब आहे. भावी आयुष्यातील नागरिक हा शिस्तप्रिय झाला तर अपघात होणार नाही. एकीकडे आपण प्रगतीचे मार्ग प्रशस्त करीत असतांना त्यासोबतच शिस्त आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर आज रस्ता सुरक्षा पथक अधिकाऱ्यांच्या पासींग आउट परेडचे मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी राजन घरडे हे होते, तर अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या निवडक शिक्षकांनी आठ दिवसाचे हे प्रशिक्षण घेतले आहे. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या प्रशिक्षणादरम्यान या शिक्षकांनी स्वत:मध्ये एक शिस्त निर्माण केली आहे. अत्यंत चांगल्याप्रकारचे प्रशिक्षण या शिक्षकांनी घेतल्यामुळे जिल्ह्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना डॉ.भुजबळ म्हणाले, रस्ता सुरक्षा पथकाबाबतचे येथील शिक्षकांना मुलभूत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून अधिकारी म्हणून तयार झाले आहेत. हे प्रशिक्षण केवळ गणवेश व अधिकारी म्हणून वावरण्यापुरते मर्यादीत नसून नविन पिढी घडविण्याचे कार्य यामधून त्यांना करावयाचे आहे. सुजान, सजग व जागरुक नागरिक घडविण्याचे काम त्यांनी करावे. अपघात विरहित कामासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणामुळे व्यवहारीक ज्ञान मिळणार असल्याचे सांगून डॉ.भुजबळ म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व स्काऊट यामधील चांगले विद्यार्थी या पथकासाठी तयार झाले पाहिजे. शाळेतून तयार होणारी पिढी ही सर्वगुणसंपन्न व्हावी यासाठी शिक्षकांनी काम करावे. हे प्रशिक्षण घेणाऱ्यांचे जीवनात क्रांतीकारक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या ५० शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात प्रिती भालेकर, अनिल उके, फत्तेलाल परिहार, पंकज राठोड व बाल सैनिक आदित्य भगत यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विद्यार्थीनींनी वाहतूकीच्या विविध नियमांबाबत प्रत्यक्ष कृतीतून सादरीकरण केले. माध्यमिक शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने