धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती : आ. रहांगडाले

0
19

तिरोडा:-तालूक्यातील सर्वात महत्वकांक्षी धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा क्र. १ चे काम पुर्णत्वास येत आहे. तसेच टप्पा क्र. २ चे काम मंजूर झाले असून ते काम लगेच सुरू करण्यासाठी आ. रहांगडाले यांचा शासनाकडे सतत पाठपुरावा आहे.१८ जानेवारीला धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प कार्यालय तिरोडा येथे आ. विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिक्षक अभियंता नार्वेकर, कार्यकारी अभियंता, पी.एम. फाळके व इतर शाखा अभियंता यांच्याशी बैठक घेतली असता आ. रहांगडाले यांनी धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा-२ अंतर्गत तालूक्यातील बोदलकसा व चोरखमारा जलाशयात नदीचे पाणी टाकण्यासंदर्भात कामाची स्थिती जाणून घेतली. या कामामध्ये होत असलेल्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत सदर काम प्राथमिकतेने शीघ्र करण्याचे निर्देश दिले. तसेच अधिक्षक अभियंता नार्वेकर यांनी १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत टप्पा-२ चोरखमारा व बोदलकसा उर्ध्वनलिकेच्या कामाचे निविदा प्रसिध्द करण्यात येणार असून, दोन्ही जलाशयांमध्ये पाणी टाकण्याचे काम केले जाईल. या योजनेला ४०० कोटी रूपयांच्या कामांना आ. रहांगडाले यांच्या प्रयत्नाने मंजुरी प्राप्त झालेली आहे.याचप्रकारे बिरसी फाट्यापर्यंत ३ कि.मी. दोन्ही जलाशयांची पाईपलाईन टाकण्यात येईल व त्यानंतर दोन्ही पाईपलाईन टाकण्यात येतील. याप्रकारे रब्बी हंगामाकरीता पाणी देण्यात येणार असून १५०० हेक्टर शेतजमीनीला पाणी मिळणार आहे.