गोंदिया फेस्टीवल निमित्ताने पारंपारिक पध्दतीची वैशिष्ट्यपूर्ण घरांची छायाचित्र स्पर्धा

0
18

गोंदिया, दि.२४ : गोंदिया जिल्हा हा निसर्ग संपदेने नटलेला आहे. या जिल्ह्यातील घरे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उतरती छपरे त्यावर गोल कवेलू छपरांना चारही बाजूंनी दिलेला उतार व तीन टप्प्यात विभागलेले छप्पर आणि त्याचप्रमाणे तीन विभागात विभागलेली घरे ही जिल्ह्यातील घरांचे वैशिष्ट्ये आहे. ग्रामीण भागात सर्वत्र सुंदर, मातीनी सारवलेली, त्यापुढे बांधलेले बैल, धानाचे पुंजणे आणि अंगणात खेळणारी मुले ही दृष्ये फार नयनरम्य असून ती जिल्हाभरात सर्वत्र पहायला मिळतात.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यातील संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी गोंदिया महोत्सवात ज्याप्रमाणे गोंडी चित्रकला, कचारगड यात्रा, स्थानिक खाद्य पदार्थ यांचा अंतर्भाव केला आहे. त्याचप्रमाणे वाढत्या शहरीकरणामुळे ही ग्रामीण घरे दुर्मिळ होत चालली आहे. ही घरे गोंदिया जिल्ह्याचे वैभव म्हणून छायाचित्राच्या रुपात जतन करुन ठेवण्याचा विचार केला आहे.
या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपआपल्या गावातील किंवा भागातील सुबक अंगण असणाऱ्या पारंपारिक मातीच्या घरांचा शक्यतो उंच जागेवरुन फोटो काढावा व स्पर्धेत भाग घ्यावा. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि स्वस्त दुकानदार यांना फोटो काढण्याचे विशेष आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे. प्रत्येक तालुक्यातील काही गावांमध्ये बाहेरगावचे पर्यटक मुक्कामासाठी येतील यादृष्टीने या स्पर्धेतील घरांचा उपयोग होणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रत्येकी १० घरांच्या छायाचित्रांची निवड करुन प्रशस्तीपत्र देण्यात येईल. वळेसेपवळरऽसारळश्र.लो या ई-मेलवर ही फोटो १० फेब्रुवारी पर्यंत पाठवावे. असे जिल्हा माहिती अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.