गडचिरोली नगर परिषदेची विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध

0
13

गडचिरोली,दि.२४: स्थानिक नगर परिषदेच्या विषय समिती सभपतींची निवड आज बिनविरोध पार पडली असून सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी आनंद श्रृंगारपवार हे विराजमान झाले आहेत. शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक समिती सभापती पदी नितीन उंदिरवाडे, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी न.प. चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी केशव निंबोड, नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी गुलाब मडावी तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीनदी अल्का अनिल पोहनकर यांची निवड झाली आहे.