३८ सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्या ई-निविदा प्रकियेतून बाहेर

0
27

ग्रामसभा घेऊन वनविभागाकडे केली होती मागणी
गोंदिया,दि.२५-गोंदिया जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांनी यावर्षीच्या तेंदुपान लिलाव प्रकियेत ई-निविदा प्रकियेपासून वगळण्याचा ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घेऊन शासनाच्या ई-निविदा प्रकियेलाच आडकाठी आणली.शासनानुसार ग्रामसभा ही महत्वाची सभा असल्याने त्या सभेचा ठराव प्रत्येक कार्यालयाला बंधनकारक असल्यामूळेच गोंदिया जिल्ह्यातील ३८ सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांना शासकीय ई-निविदा प्रकियेतून वनविभागाने वगळले होते.या वनहक्क व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून १६ घटकातील ३८ गावातून ४४९५ प्रमाण गोणी तेंदुपान सामुहिक वन हक्कातंर्गत संकलन करण्यात येणार आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ,भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातील १०९ गावातील सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्या १५ हजार प्रमाण गोणी तेंदूपान संकलीत करणार आहे.यासाठी ई-निविदा प्रकिया न झाल्याने ग्रामसभेने घेतलेल्या ठरावानुसार सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांनी आपपल्या परिसरातील तेंदुपानाची विक्री करतांना मात्र खरेदीदार हा एकच निवडल्याने अधिक दराने तेंदुपान घेऊ इच्छिणारे व्यापारी यापासून वंचित राहिले.विशेष म्हणजे यावर्षी तेंदूपान खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात व्यापारी वर्ग उत्सुक दिसून येत आहे.सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांची स्थापना वनविभागामार्फत करण्यात आली आहे. या समित्यांच्या माध्यमातून जंगलातील तेंदूपानासह जंगलातील इतर वनोपज तोडणे आणि त्यांची विक्री करण्याचे कार्य केले जाते.वनविभागने या ३८ गावातील तेंदूपान वगळून इतर गावातील तेंदूपानाची विक्री मात्र शासकीय ई-निविदा प्रकियेतून केली आहे.परंतु ज्या ३८ वनहक्क व्यवस्थापन समित्यांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन ई-निविदाप्रकियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.त्या सर्व समित्यांना १० जानेवारी रोजी उपवनसरंक्षक कार्यालयाने पत्र देऊन तेंदूपान विक्री संबधात कोणती प्रकिया अवलंबली याबाबत स्पष्टीकरण मागितले असून १० दिवसाचा काळ लोटूनही या ३८ वनहक्क व्यवस्थापन समित्यांनी अद्यापही माहिती वनविभागाला दिलेली नाही.त्या गावामध्ये हेटी,सावंगी,qसदिपार,बिर्री,माहूली,टेमणी,कोलारगाव(कोसबी),खडकी(बा),प्रधानटोला,कोयलारी,कोहळीटोला(आदर्श),गोपालटोली,डव्वा,चिरचाडी,लेंडेझरी,मुरझाड,घटेगाव,कोसमतोंडी,पांढरी,मोहाडी,कोटजांभोरा,पिपरखारी,धमदीटोला,मांगोटोला,धवलखेडी,मिसपिरी,महाका,तुमडीकसा,पाऊलझोला,मेहताखेडा,वासनी,सुंदरी,येडमागोंदी,कोसबी,चारभाटा,चुटिया(लोधीटोला) व तेढा यांचा समावेश आहे.