वर्षपूर्ती भूमिपूजनाचीः अन् भाजपचे केंद्रीय मंत्रीसुध्दा ठरले ‘भूमिपूजनकरी‘

0
13

खेमेंद्र कटरे
गोंदियादि.२५- निवडणुकीत घोषणांचा पाऊस पाडणाèया भाजपचेही महामार्गप्रकरणी लवकरच पितळ उघडे पडले आहे. गेल्या वर्षी २३ जानेवारीला जिल्ह्यातील राज्यमार्गाचे महामार्गात रूपांतर करण्यासाठी भाजपने मोठ्या थाटात ना. नितीन गडकरी यांचे हस्ते भूमिपूजन उरकून गोंदियाकरांना विकासाची स्वप्ने दाखविली खरी. परंतु, भूमिपूजनापलिकडे अद्यापही कामाला सुरवात झाली नाही. परिणामी, गेल्या निवडणुकीत इतरांना हिणवणारी गोंदिया जिल्ह्यातील भाजप आता आपल्या केंद्रीय मंत्र्यांचे ‘भूमिपूजनकरीङ्क असे बारसे करणार का, असा सवाल गोंदियाकरांना पडला आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने विकासाचा नारा देत केंद्रातील व राज्यातील सत्ता हस्तगत केली. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेला भाजप भुरळ घालण्यात यशस्वी झाली. परंतु, आता हळूहळू जनतेचे स्वप्नभंजन होताना दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यातही भाजपने प्रचाराचा धुरळा उडवत आपल्या विरोधकांना चांगलेच टार्गेट केले होते. विशेष म्हणजे गल्लीबोळात प्रचार करताना काँग्रेसच्या आमदारांना भूमिपूजनदास म्हणण्यापर्यंत भाजपच्या पदाधिकाèयांनी मजल मारली होती. परंतु, आता जिल्ह्यातून जाणाèया राज्यमार्गाचे महामार्गात रूपांतर करण्याची प्रक्रिया केवळ भूमिपूजनावर अटकल्याने जिल्ह्यातील दोन्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातून जाणाèया राज्यमार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करून विविध मुख्य मार्गाचे बांधकाम व उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी भाजपने सुमारे ४ हजार कोटी रुपयाच्या कामाची घोषणा केली होती. त्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्तेवाहतुक मंत्री ना. नितीन गडकरी यांचे हस्ते गेल्यावर्षी २३ जानेवारी २०१६ रोजी मोठ्या थाटात उरकले होते. या भूमिपूजन सोहळ्याला एक वर्ष लोटले. मात्र, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भूमिपूजन केलेल्या एकाही कामाला अद्याप सुरवात झाली नाही. उल्लेखनीय म्हणजे घोषणा करण्यात आलेल्या महामार्गात एकाही चौपदरी महामार्गाचा समावेश नाही, हे विशेष. नवे घोषित महामार्ग हे केवळ दुपदरी असल्याची माहिती राष्ट्रीय राजमार्ग बांधकाम विभाग नागपूरच्या कार्यकारी अभियंता श्रीमती साखरवाडे यांनी दिली.
विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या २ राष्ट्रीय महामार्गापैकी २७१ क्रमांकाचा राज्यमार्ग असलेल्या डुग्गीपार (कोहमारा) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (एनएच६) पासून सुरू होणारा नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ हा कोहमारा- गोरेगाव- गोंदिया- तिरोडा-तुमसर-उसर्रा-जांब-शिव-रामटेक-पारशिवनी-खापा-सावनेरला जोडणारा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ४७ ला जोडला जाणार आहे. या सोबत राज्यमार्ग क्र. ३४२ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३४ मध्ये नव्याने घोषित करण्यात आलेला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग मध्यप्रदेशातील शहडोल येथून सुरू होणाèया ४७ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गापासून सुरू होऊन qडडोरी- मंडला- नैनपूर लामठा-बालाघाट मार्गे महाराष्ट्रातील रजेगाव-धामणगाव-रावणवाडी-गोंदिया-आमगाव-देवरी-कोरची-कुरखेडा-वडसाला मार्गे ब्रम्हपूरी येथील राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी ला जोडला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी मार्गाची अधिसूचना ४ एप्रिल २०११ नंतर २७ डिसेंबर २०१६ रोजी नवीन संशोधित अधिसूचनेद्वारे या मार्गांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने ३ जानेवारी २०१७रोजीच्या राजपत्रात दिली आहे. यावरून या महामार्गांना मंजुरी २०१७ मध्ये मिळाली असून केंद्रीयमंत्र्यांनी मात्र महामार्गाला मंजुरी मिळण्याआधीच भूमिपूजन उरकून घेतले.
यामध्ये कोहमारा ते गोंदिया या ४४ किलोमीटरचा मार्ग नव्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३मध्ये समाविष्ट झाला आहे. या मार्गावर नागझिरा व्याघ्रप्रकल्प आणि बफर झोन आल्याने २८ किलोमीटरच्या रस्ता बांधकामाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. या मार्गावरील फक्त गोरेगाव ते गोंदिया या १४ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी देऊन त्या बांधकामाचे टेंडर जानेवारी २०१७ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर काढण्यात आले आहे. हा रस्ता १४ मीटर रुंदीचा दुभाजकासह दुपदरी राहणार आहे. परंतु, वनविभागामूळे पुन्हा २८ किमीचा रस्त्याला केंद्रीय वन व पर्यावरण समिती केव्हा मंजुरी देते, यावरच या रस्त्याचे भवितव्य अवलंबून आहे. याशिवाय ज्या उड्डाण पुलांची घोषणा करण्यात आली, त्यापैकी एकाही उड्डाण पुलाचे बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. नव्या बायपासरस्त्यासह इतर रस्त्यांच्या टेंडर प्रकियेला सुद्धा अद्यापही सुरवात झालेली नाही. यावरून निविदेआधी भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे भूमिपूजनाचे स्वांग म्हणजे जनतेच्या हातावर तुरी असाच काहीसा प्रकार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ना. गडकरींच्या हस्ते गोंदियाच्या मोक्षधाम मार्गावर आयोजित एका कार्यक्रमात गोंदिया-मनसर-रामटेक १ हजार २०० कोटी, गोंदिया-बालाघाट-सिवनी १ हजार ३०० कोटी, गोंदिया पश्चिम बायपास व २ रेल्वेपूल ६०० कोटी, छत्तीसगड महाराष्ट्र सीमा पूल ८० कोटी, मुंडीपार-मांडोदेवी-हरदोली-६० कोटी, केशोरी-वडेगाव-लाखांदूर-१२.५ कोटी, सडक अर्जुनी-शेंडा ४० कोटी, अड्याळ-नवेगाव-चिचगड १२ कोटी, तिरोडा-खैरलांजी-बालाघाट मार्ग ५ कोटी, धवलखेडी-चिकोटा नाला पूल २० कोटी, तिरोडा-काचेवानी मार्ग व १ रेल्वे पूल बांधकामासाठी ३५ कोटी, गोंदिया-गोरेगाव-कोहमारा ४२५ कोटी, महादेवघाट पूल १० कोटी, सौंदडरेल्वे पूल ८० कोटी आणि गोंदिया बायपास करिता २४ कोटी अशा ४ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजनाला एक वर्ष लोटला तरी एकाही कामाला अद्यापही सुरवात झाली नाही.