भंडारा,गोंदिया व तिरोडाच्या नगराध्यक्षांनी स्विकारला पदभार

0
21

पहिल्यांदाचा खुल्या स्वरुपात नगराध्यक्षांचा पार पडला पदग्रहण सोहळा
गोंदिया-भंडारा,berartimes.com,दि.७- : डिसेंबर व जानेवारी महिन्यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या.यामध्ये साकोली नगरपरिषदेची पहिलीच निवडणुक असल्याने त्या पालिकेच्या नगराध्यक्ष व इतर पदाधिकाèयांचा पदग्रहण सोहळा हा साधेपणाना पार पडला.परंतु उर्वरित पाच नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा मंगळवार(दि.७)ला घेण्यात आला.यासाठी नगरपरिषद मुख्यालयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे नगराध्यक्ष व नगरसेवकांचा प्रथमच पदग्रहण सोहळ्या खुल्यास्वरुपात घेण्यात आला.यापुर्वी अशाप्रकारचा पदग्रहण कार्यक्रम दोन्ही जिल्ह्यात कधीच घडलेला नव्हता.
नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांच्या झालेल्या निवडणुकीत भंडारा,गोंदिया ,तुमसर व तिरोडा नगर परिषदेत भाजपला निर्विवाद विजय मिळाला. पूर्वीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला नसल्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाèयांना दीड महिना प्रतीक्षा करावी लागली होती. ८ फेबुवारीला कार्यकाळ संपुष्ठात येत असल्यामुळे आज ७ फेबुवारी रोजी भंडाराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे,गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे,तुमसरचे नगराध्यक्ष इंजि.प्रदिप पडोळे व तिरोड्याच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी जाहिर कार्यक्रमाच्या माध्यमातून पदग्रहण केले.
आज मंगळवारला दोन्ही जिल्ह्यातील नगराध्यक्षांच्या पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्याला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले,खासदार नाना पटोले,भाजपचे प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर,आमदार डॉ.परिणय फुके,आमदार अनिल सोले,आमदार विजय रहागंडाले, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशीवार,भंडारा भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी,गोंदिया जिल्हा भाजपा अध्यक्ष हेमंत पटले,माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,माजी आमदार खोमेश्वर रहागंडाले,केशवराव मानकर,हरिष मोरे,भजनदास वैद्य,माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे,जि.प.सभापती रचना गहाणे,छाया दसरे,बालाघाटच्या मोसम हरिणखेडे,बालाघाटचे नगराध्यक्ष,सरला भारद्वाज,दिलीप चौधरी,लिखेंद्र बिसेन,तिरोडा कृषी उत्पन बाजार समितीचे मुख्य प्रशासक डा.चिंतामणभाऊ रहांगडाले, मदन पटले,भाउराव कठाणे,सलामभाई शेख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे,अमृत देशपांडे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
भंडारा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले रूबी चढ्ढा यांची वर्णी लागणार असल्याचे सूत्राने सांगितले.भंडारा नगरपरीषद स्विकृत सदस्यपदी भाजपचे मंगेश वंजारी, चंद्रशेखर रोकडे,रॉंकाचे बाबुराव बागडे यांची निवड करण्यात आली.
गोंदिया नगरपरिषद उपाध्यक्षपदासाठी शिव शर्मा यांचे नाव पक्के झाले आहे.गोंदियात १० फेबुवारीला सभापतींची निवड होणार असून बांधकाम सभापतीपदासाठी घनश्याम पानतवणे यांचे नाव चर्चेत आहे.त्यातच भावना कदम यांचे पण नाव चर्चेत असले तरी त्यांच्याकडे जिल्हा महिलाभाजपचे अध्यक्षपद असल्याने या पदामुळे जिल्ह्यात पक्षाबांधणीत महिलांच्या सहभागाकडे दुर्लक्ष होऊन पक्षाला नुकसान होऊ शकते अशी भिती व्यक्त करीत त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद असल्याने आणि नगराध्यक्ष हे सिव्हील लाईनभागातीलच असल्याने त्यांच्यासोबतच सलग दुसèयांदा निवडून आलेल्या मैथुला बिसेन यांच्या नावाचीही चर्चा एैनवेळेवर केली जाऊ शकते अशी चर्चा आहे.शर्मा यांच्याकडे स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग राहण्याची चर्चा वर्तविली जात आहे.गोंदियात स्विकृत सदस्यामध्ये राष्ट्रवादी १ व काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.काँग्रेसच्यावतीने भाजपसोबत जि.प.सारखेचे नगरपरिषदेतही सत्तेत राहण्यासाठी हातपाय मारले गेले,मात्र शिव शर्मा यांनी काँग्रेसचे हातपाय राष्ट्रवादीला धरुन बांधून ठेवल्याची चर्चा आहे.