पोवार समाजाने घटनात्मक लढ्यासाठी पुढे येण्याची गरज-डॉ.खुशाल बोपचे

0
10

रामटेक,berartimes.com दि.१३-पोवार समाजाचे कुलदैवत चक्रवती राजाभोज यांनी सर्व समावेशक जातीधर्मांना आपल्या राज्यात समानतेची वागणूक दिली. शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन त्या काळी त्यांनी करुन ठेवले. अशा चक्रवती राजाभोज महाराजांच्या जीवन चरित्राची अंमलबजावणी आजच्या काळात आपल्या समाजासाठी राबविण्याची खरी गरज आहे. ती गरज भारतीय राज्यघटनेने पूर्ण केली असून त्या राज्यघटनेतील कलम ३४० अन्वये आपला समाज ओबीसी प्रवर्गात येणाèया जात समूहात असल्याने या संवैधानिक कलमाचे अधिकार प्राप्त करुन घेण्यासाठी नवयुवकांनी व समाजातील युवतींनी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी केले.
ते रामटेक येथील क्षत्रीय पोवार समाज संघटनेच्यावतीने रामाडेश्वर मंदिर परिसरात आयोजित राजाभोज महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रविवारी (दि.१२) बोलत होते. या कार्यक्रमाचे उदघाटन भंडारा पोवार समाज संघटनेचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी केले. याप्रसंगी रामटेकचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख, बेरार टाईम्सचे संपादक व गोंदिया भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती सयोंजक खेमेंद्र कटरे,सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण गौतम, राजयोगीनी ब्रम्हकुमारी ललीतादीदी, बंसीधर शहारे, मनोज बिसेन, पोलीस पाटील खुशाल ठाकरे,छत्रपाल पटले, माजी पं.स.सदस्य श्रीमती रहांगडाले व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होेते.
डॉ. बोपचे पुढे म्हणाले की, पोवार समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश आहे.त्यातच आपला समाज हा शेतीशी निगडित असल्याने गावखेड्यातला समाजबांधव आजही मागासपरिस्थितीत आहे.त्यामुळे समाजाच्या उज्वल भविष्यासाठी पोवार समाजानेही संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी समोर येण्याची गरज आहे. आरक्षणाबाबत आपल्या समाजात चुकीचे गैरसमज पसरविले जात असून ज्यांनी पाच हजार वर्षापासून आपल्याकडेच काही गोष्टी राखून आरक्षणाचा लाभ घेतला,ते मनुवादी विचारसरणीचे काही लोक सविधानाने दिलेल्या अधिकाराबाबत ओबीसी समाजात चुकीचा संदेश देऊन आपल्यासह ओबीसी प्रवर्गातील जातीमध्ये भाडंण लावण्याचे काम करीत आहेत.त्यापासूनही आपल्या समाजाने सावध होत सवैधानिक हक्कासाठी ओबीसींच्या लढ्यात सहभागी होणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले. यावेळी चेतन भैरम यांनी इ.स.१००० मध्ये परकीय आक्रमाणापासून अखंड भरताला संरक्षण देण्याचे काम चक्रवती राजाभोज यांनी त्यावेळी करत सर्वच जाती धर्मांच्या धर्माला पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन देल्याचे म्हणाले. तसेच पवार समाज राजाभोज महोत्सवाच्या माध्यमातून संघटीत होत असल्याचे विचार व्यक्त केले. यावेळी रामटेकचे नगराध्यक्ष देशमुख यांनी पोवार समाजाच्या अंबाडा येथील होणाèया सभागृहाकरिता प्रशासनाच्यावतीने जे काही सहकार्य लाभेल ते देण्याचे आश्वासन दिले. तर लता दीदी यांनी येत्या कोजागिरीला सांस्कृतीक भवनाचे भूमिपूजन करुन तिथेच कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष व समाजातील इयत्ता १० व १२ च्या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष भगवानदास बिसने,उपाध्यक्ष छमेशकुमार पटले,सचिव संजय बिसेन,आशिष शरणागत,आशिष भगत,खरकqसग बिसेन,रमेश पटले,जयqसग बिसेन,उमेश पटले,भोजराज कटरे,राहुल जैतवार,सचिन भोयर आदीनी सहकार्य केले.