राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत कार्यशाळा

0
15

गोंदिया,दि.१५ : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या विषयावर पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत १५ फेब्रुवारी रोजी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे लेखा व कोषागारे सहसंचालक विजय कोल्हे होते. यावेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी अनंता मडावी, वरिष्ठ लेखा अधिकारी विजय जवंजाळ, कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, अपर कोषागार अधिकारी पी.डी.पारधी, अर्चना सोलंकी, ए.यु.हुमने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेला जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी व एनपीएस कर्मचारी असे जवळपास ३०० जणांची उपस्थिती होती. कार्यशाळेत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन प्रात्यक्षिकाद्वारे लेखा व कोषागारे नागपूरचे लेखाधिकारी श्री.कोठे यांनी केले. कार्यशाळेत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेबाबत कार्यपध्दती व उपलब्ध सेवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्राण किटचा वापर करण्याबाबत संगणकाबाबत सादरीकरण करण्यात येवून माहिती देण्यात आली. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक उपकोषागार अधिकारी आर.व्ही.पांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार कनिष्ठ लेखा अधिकारी एस.जी.डोंगरे यांनी मानले.