भाजी बाजारात पॉलिथिनमुक्ती; सावित्रीबाई फुले भाजी विक्रेता संघाचा निर्णय

0
10

गोंदिया,दि.१८ : वाढत्या प्रर्दुषणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या द्ृष्टीने पॉलिथीनचा वापर कमी करण्यावर शासन भर देत आहे. स्वच्छ शहरआणि प्रर्दुषणमुक्तीच्या या लढ्यात सावित्रीबाई फुले भाजी विकदृेता संघाने देखील उडी घेतली. पॉलिथीनमुक्त बाजार करण्याकरिता त्यांनी एक पाऊल पुढे केले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे यांनी दिली. त्यांच्या या निर्णयाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासह पालिका प्रशासनाने अभिनंदन केले.
वृक्षतोड आणि कॉंकीटचा अधीक वापर यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात पुन्हा पॉलिथिनच्या अधीक वापराने भर घातली. पॉलिथिनचा गेल्या काहीवर्षात सर्रासवापर वाढल्यामुळे ठिकठिकाणी पॉलिथिन पडून असल्याचे दिसून येते. सांडपाणी या पॉलिथिनमुळे वाहून जात नाही. त्याचबरोबर जनावरे पॉलिथिन खात असल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची संख्या देखील झपाट्याने वाढू लागली. ही समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी, याकरिता राज्य आणि केंद्र शासनाने पॉलिथिनचा वापर कमी करण्याकरिता विविध उपाययोजना सुचविल्या. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. हाच संकल्प शहरातील भाजी बाजारातील सावित्रीबाई फुले भाजी विक्रेता संघाने घेतला. त्यासंदर्भात संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे यांनी बाजारात फिरून दुकानदारांना पॉलिथिनचा वापर न करण्याचे आवाहन केले. कृष्णकुमार लिल्हारे यांच्या या संकल्पाचे स्वागत गोंदिया पालिकेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले. त्याचबरोबर दिनेश दादरीवाल, राकेश ठाकूर, शकील मन्सूरी, अरूण शुक्ला, मुकेश शिवहरे, श्री पुरोहित यांनी या निर्णयासंदर्भात कृष्णकुमार लिल्हारे यांचे अभिनंदन केले.