६३ हजार नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ

0
14

गोंदिया,दि.१९ -जुलै २०१६ या कालावधीत जिल्ह्याच्या अर्जुनी- मोर, गोरेगाव, सडक अर्जुनी या तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत व दिव्यांग स्वावलंबन अभियान अतंर्गत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साहित्य व साधने मोजमाप शिबीर म्हणून पूर्वतयारी समाधान शिबीर घेण्यात आले होते. ज्यामध्ये ४८ हजार नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्रातून ६३ हजार नागरिक शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले.
या लाभाथ्र्यांना संबंधित योजनांचा लाभ देता यावा यासाठी तिन्ही तालुक्यात महावितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात अर्जुनी -मोर विधान सभा क्षेत्रातून करण्यात येत असून उद्या, २१ फेबु्रवारी रोजी अर्जुनी -मोर येथील तहसील कार्यालयात संबंधित गरजू पात्र लाभाथ्र्यांना पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात येणार आहे. याचप्रमाणे गोरेगाव व सडक अर्जुनी येथील पात्र नागरिकांनाही संबंधित साहित्यांचा वाटप करण्यात येणार असून २२ फेबु्रवारी रोजी सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात तर २३ फेबु्रवारी रोजी गोरेगाव येथील पंचायत समितीच्या प्रांगणात हे महावितरण शिबीर घेण्यात येणार आहे. अर्जुनी मोर क्षेत्रातील नागरिकांमध्ये ४५०० शिधर पत्रिका, ५३३ सं.गा. यो., १२१२ श्रावण बाळ योजना, १८५ राष्ट्रीय कुटूंब, २६९ आम आदमी विमा, इं.गां. रा. वि.नि.वे.यो. १२१, जमीन वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुपांतर ३०२८, संपत्त्त्तीचे आपसी वाटणी पत्र ५८, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र १३ हजार ७६,जातीचे प्रमाण पत्र ७ हजार ७११, जमीन मोजणी ५६, जमीन सुपिकता प्रमाणपत्र ६ हजार ५८१, कृषीपंप विद्युत जोडणी २२८, वीज व्यवसायीक जोडणी २८, घरघुती वीज जोडणी ५२१, रमाई घरकूल ४०, इंदिरा आवास १८१, मुद्रा बँक कर्ज ४६, सुकन्या समृध्दी योजना १००, पीक विमा योजना ८ हजार ३४०, शेतकरी अपघात विमा योजना १६, आंतरजातिय विवाह प्रोत्साहन योजना १७, वन्यप्राण्यांनी केलेली नुकसान भरपाई १२७, महामंडळ द्वारे कर्ज पूरवठा १७७, वनहक्क जमीनीचे पट्टे वाटप ६५, विद्यार्थी सायकल वाटप २४१, शिलाई मशिन वाटप ६०, अपंगत्व ओळखपत्र २१३, आधारकार्ड, मतदान कार्ड, अधिवास प्रमाण पत्र ६ हजार ५००, डिजेल पंप वाटप ३०, उज्वला गॅस कनेक्शन वाटप ६ हजार ३२३, जननी सुरक्षा योजना २७९, मानव विकास कार्यक्रम ३००, माहेर घर योजना २३, वन विभाग गॅस पुरवठा २००, शेडनेट पालिहॉऊस २५, बैलजोडी ५९, जनधन योजना१५६, पाईप वाटप ५० नग १३ लाभार्थी,शेतीपयोगी औजारे धान उडविणारे पंखे ५, बैलगाडी २८, पी. आर. कार्ड १००, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर १९, अपंगत्व प्रमाणपत्रे २०४, अपंग व्यक्तींना सहाय्यक साधने व उपकरणे वाटप ६२६, गटई कामगारांना स्टाल वाटप ०९, आदी साहित्यांचे वाटप पालकमंत्री ना. बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.