तिरोडा विधानसभा मतदारसंघात कोट्यावधीच्या कामांचे भूमिपूजन

0
10

तिरोडा,berartimes.com दि.२६-तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्गत येणाèया विविध गावामध्ये २५ फेबुवारीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आमदार विजय रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली कोट्यावधीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यामध्ये तिरोडा नगरपरिषद क्षेत्रामध्ये नगर परिषद अंतर्गत विशेष वैशिष्टयपूर्ण योजनेद्वारे ४ कोटी ५० लक्ष खर्चाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन गांधी शाळेच्या आवारात करण्यात आले.त्याचप्रमाणे गराडा येथील काशीघाट येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोल्हापुरी बंधारा बांधकामाचेही भूमिपूजन करण्यात आले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत तिरोडा तालुक्यातील चुरडी-लेंडीटोला या ९ किमी रस्ता बांधकाम ४ कोटी ५० लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.बेरडीपार येथील ५ कोटी ५० लाख रुपये खर्चाचय आरोग्य केंद्र इमारतबांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले.या सर्व कार्यक्रमाना तिरोड़ा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे,भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार भजनदास वैद्य, माजी आमदार हरीश मोरे, न प उपाध्यक्ष सुनील पालांदुरकर, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊदास कठाने, जि प सदस्य रजनी कुंभरे, माजी जि प उपाध्यक्ष मदन पटले, भाजपा शहर अध्यक्ष सलाम शेख, चिंतामन रहांगडाले, जि प उपाध्यक्ष रचना गहाने,गुड्डू लिल्हारे , सरपंच ज्योत्स्ना टेम्भेकर, डॉ बसंत भगत, रजनी कुंभरे, पवन पटले, कार्यकारी अभियंता नंदनवार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ श्याम निमगड़े, उप अभियंता सुनील तरोने यांच्यासह जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.