नंदा जिचकार महापौर तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर

0
10

नागपूर दि.०5: महापालिकेत सत्तेची हॅट्ट्रिक मारणाऱ्या भाजपाच्या कारभाराची आज, रविवारपासून पुन्हा एक नवी सुरुवात झाली आहे. महालातील नगरभवनात सकाळी १० वाजता आयोजित विशेष सभेत महापौरपदाच्या निवडणूकीत भाजपाच्या नंदा जिचकार 82 मतांनी विजयी झाल्या.जिचकार यांना 108 मते तर कॉँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांना 26 मते, बसपाच्या वंदना चांदेकर यांना 10 मते मिळाली.
१५१ नगरसेवकांच्या महापालिकेत भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक पोहचले आहेत. संख्याबळ नसतानाही काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी नेहा विवेक निकोसे यांनी तर उपमहापौरपदासाठी नितीश ग्वालबंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बसपातर्फे महापौर पदासाठी वंदना चांदेकर यांनी तर उपमहापौर पदासाठी नरेंद्र वालदे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.अल्पमताात असलेल्या विरोधकांना एकजूट दाखविता आलेली नाही. महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता जिचकार व पार्डीकर यांची निवड निश्चित असल्याने ही निवडणूक एक औपचारिकताच ठरली.