गर्ल्स महाविद्यालयात महिला दिन कार्यक्रम

0
13

गोंदिया,दि.९ :जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उपविभागीय कार्यालय गोंदियाच्या वतीने एस.एस.गर्ल्स महाविद्यालय गोंदया येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्याय अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती नम्रता चौधरी, जिल्हा संरक्षण अधिकारी श्रीमती रुपाली सोयाम, समाज सेविका श्रीमती निशा भुरे, श्रीमती वाहणे, प्राचार्य बहेकार उपस्थित होते.जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, देशाचा विकास घडवून आणण्यासाठी महिलांचे सबळीकरण करणे आवश्यक आहे. भारत व चीनची तुलना करता चीन अधिक विकसीत असण्याचे मुख्य कारण म्हणजे तिथल्या महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. तेथे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले.
वालसकर यांनी १८ वर्षावरील सर्व विद्यार्थीनींचे मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन यावेळी केले. श्रीमती चौधरी यांनी सर्वच दिवस महिला धावपळ करत जगत असतात तरी आपल्या कुटुंबाची योग्यरित्या जबाबदारी सांभाळतात असेही त्यांनी सांगितले व नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीकरीता उपस्थितांना प्रेरीत केले व विविध योजनेबाबत माहिती दिली. श्रीमती सोयाम यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे रक्षण कसे येईल यावर मार्गदर्शन केले. श्रीमती निशा भुरे यांनी महिलांच्या विवादीत प्रकरणासंबंधी मार्गदर्शन केले. श्रीमती वाहणे यांनी राष्ट्रीय एकता व सांप्रदायीक सदभावना याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाला तहसिलदार अरविंद हिंगे, नायब तहसिलदार आर.ए.वाहणे, न.प.शिक्षण सभापती श्रीमती भावना कदम, महिला संरक्षण अधिकारी आर.के.भाजीपाले, जिल्हा बालविकास कार्यालयाचे परिविक्षा अधिकारी राजु महाराज बोदले, तसेच संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक एस.एस.गर्ल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.के.बहेकार यांनी केले. संचालन प्रा.डॉ.कविता राजाभोज यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजश्री धामोरीकर यांनी मानले.