अधिवेशनानंतर नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देणार- गिरीष महाजन

0
10

मुंबई, दि. 9 : नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात दररोज वृत्तपत्रात वेगवेगळ्या स्वरुपाच्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील परिस्थिती पाहण्याकरिता अधिवेशनानंतर या हॉस्पिटलला
नागपूर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींसह भेट देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अवस्थे संदर्भात विधानपरिषद सदस्य प्रा.अनिल सोले, नागोराव गाणार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्याविषयी श्री. महाजन बोलत होते. नागपूर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे तीन पाळीत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयाच्या सुरक्षेकरिता मेस्को या संस्थेकडून 14 सुरक्षारक्षक आणि 1 सुपरवायझर यांच्या सेवाही घेण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलच्या परिसरातील स्वच्छतेकरिता 4 अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून सदर समितीच्या देखरेखीखाली रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेण्यात येत असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.