डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे महिला दिन साजरा

0
14

सडक/अर्जुनी ,दि.१० : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती कविता रंगारी, नगराध्यक्ष रीता लांजेवार, जि.प.सदस्य सरीता कापगते, माधुरी पातोडे, ठाणेदार केशव वाभळे यांची उपस्थिती होती. यावेळी सुरक्षा समिती सदस्य मिरा सोनावने, तालुका संयोजिका हर्षा राऊत, पाटेकुर्रा पोलीस पाटील ललिता कवरे, डोंगरगाव पोलीस पाटील रंजू चाचेरे, हेटी पोलीस पाटील शिशुकला शहारे, बाम्हणी सरपंच शारदा मेश्राम, महिला राजसत्ता आंदोलन जिल्हा संघटीका शर्मिला चिमणकर व पोलीस स्टेशन डुग्गीपार येथील महिला पोलीस कर्मचारी बोहरे, रोहिनी डांगे, वालदे, निखारे, टेभुर्णीकर, भोयर, टेंभूर्णे, तिलगाव, हरिणखेडे, काळे व शिरघड तसेच अनेक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.