मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य भेट

0
9

गोंदिया,दि.१० : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे १० मार्च रोजी गोंदिया येथे खाजगी दौऱ्यानिमित्त बिरसी विमानतळ येथे आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री चौहान यांना राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारे ‘महाराष्ट्र अहेडङ्क या इंग्रजी मासिकाचा फेब्रुवारी २०१७ चा अंक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी भेट म्हणून दिला. यासोबतच त्यांना शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाचा जानेवारी व फेब्रुवारी २०१७ या महिन्यातील हिंदी लोकराज्य अंक सुध्दा भेट म्हणून दिले. जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे यांनी मासिक भेट देतांना याबाबतची थोडक्यात माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसिलदार अरविंद हिंगे, अप्पर तहसिलदार के.डी.मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.