जीडीसीसी बॅंकेत एटीएम सेवा सुरू

0
12

अर्जुनी मोरगाव दि.12: येथील सेंट्रल को-ऑप. बँक शाखेत एटीएम सेवा सुरू करण्यात आली. बँक संचालक केवळराम पुस्तोडे यांच्या हस्ते नवीन एटीएमचे उद््घाटन झाले. यावेळी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भोजराम रहेले, बँकेचे सीइओ वासनिक, माजी जिल्हा कृषी अधिकारी मनोहरराव चंद्रीकापुरे, मनोहर शहारे, बंडुभाऊ भेंडारकर, राकेश लंजे, सोनदास गणवीर, शालिकराम हातझाडे, गोपाल परशुरामकर उपस्थित होते.
ग्राहकांना मूलभूत सुविधा पुरविणे, ग्राहकांना इतर बँकांप्रमाणे आपल्या बँकेतही सुविधा मिळाव्यात, पैसे काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी बँक प्रशासन नेहमी तत्पर असते. ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएमची सुरुवात जिल्हाभरातील शाखामध्ये होणार असल्याची माहिती केवळराम पुस्तोडेंनी दिली. कार्यक्रमाचे संचालन व्यवस्थापक डोये तर आभार उद्धवराव मेहंदळे यांनी मानले. यावेळी बँकेचे ग्राहक, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.