बुलडाणा जिल्ह्यात पंचायत समिती सभापती व उपसभापती जाहीर

0
34

बुलडाणा दि‍. 14 – जिल्ह्यात 13 पंचायत समित्यांसाठी 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले. या निवडणूकीची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी झाली. विद्यमान सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ 13 मार्च 2017 रोजी संपुष्टात आला. त्यानुसार आज 14 मार्च 2017 रोजी पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडून आलेल्या सदस्यांमधून सभापती व उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये काही सभापती व उपसभापती ईश्वर चिठ्ठीने निवडण्यात आले. पंचायत समितीनिहाय सभापती व उपसभापती पुढीलप्रमाणे :
संग्रामपूर : सभापती श्रीमती तुळसाबाई भारत वाघ (भाजपा) व उपसभापती श्रीमती उज्ज्वला नंदकिशोर घायल (भाजप), मलकापूर : सभापती श्रीमती संगीता दादाराव तायडे (भाजपा) व उपसभापती श्रीमती सिमाताई बगाडे (भाजपा), लोणार: श्रीमती निर्मला रोहीदास जाधव (शिवसेना) व उपसभापती श्रीमती अरूणा निलेश महाजन (रा.काँ), चिखली : सभापती संजय पांढरे (काँग्रेस) व उपसभापती जितेंद्र कलंत्री (भाजपा), नांदुरा : सभापती श्रीमती अर्चना पाटील (काँग्रेस) व उपसभापती श्रीमती सुनीता डिवरे (शिवसेना), शेगांव : सभापती विठ्ठल भास्कर पाटील (भारीप-बमसं) व उपसभापती श्रीमती शालीनी सुखदेव सोनोने (भारीप-बमसं), सिंदखेड राजा : सभापती राजेश श्रीपत ठोके (रा.काँ) व उपसभापती श्रीमती गीता सुका जाधव (भाजप), बुलडाणा : सभापती श्रीमती तस्लीनादी रसूल खान (काँग्रेस) व उपसभापती श्रीमती कविता लहासे (भारीप-बमसं), देऊळगांव राजा : सभापती श्रीमती रजनी राजेंद्र चिट्टे (रा.काँ) व उपसभापती हरीभाऊ गंगाराम शेटे (रा.काँ), खामगांव : सभापती श्रीमती उर्मिलाताई गायकी (भाजपा) व उपसभापती भगवानसिंग सोळंकी (भाजपा), मेहकर : सभापती श्रीमती जया खंडारे (शिवसेना) व उपसभापती राजूभाऊ धनवट (शिवसेना), मोताळा : सभापती श्रीमती पुष्पा उखा चव्हाण (काँग्रेस) व उपसभापती सरस्वती रामदास भोरे (शिवसेना), जळगांव जामोद : सभापती श्रीमती गिता तेजसिंग बंडल व उपसभापती रामा राऊत (भाजपा)