लेखी आश्वासनानंतर झाडावरुन उतरला आंदोलनकारी मजुर

0
8

मग्रारोहयो बीडीओच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय चौकशी समिती
गोंदिया,दि.१५ : गोरेगाव तालुक्याच्या कमरगाव येथे २०१२ -१३ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, पूर्ण मजुरी देण्यात यावी, अशी मागणी करता करता प्रशासनाचे उंबरठे झिजविले. मात्र, पदरी निराशाच आली. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडित मजुराने आज, बुधवारी जिल्हा परिषदेसमोरील झाडावर चढून विरूगिरी केली. या प्रकारामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली. रोजगार सेवक व गटविकास अधिकाèयावर कारवाईचे ठोस आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत झाडावरून खाली उतरणार नाही, असा पवित्रा मजुराने घेतला. त्यामुळे अनूचित प्रकार घडू नये म्हणून गोंदिया ग्रामीण पोलिसांना माहिती कळताच त्यांनी दलबलासह जि.प.गाठले.सोबत अग्निशमन विभागाच्या गाड्या व रुग्णवाहिकाही.त्या विरुगिरी करणाèया मजुराचे नाव लिखिराम काशीराम राऊत (वय ६५, रा. कमरगाव,ता.गोरेगाव) असे आहे.जोपर्यंत बीडीओवर कारवाई होत नाही,तोपर्यंत खाली येणार नाही या मागणीवर सदर मजुर ठाम होता.जेव्हा जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.पुलकुंडवारच्यावतीने लेखी आश्वासन देत सदर प्रकरणात मग्रारोहयोचे बीडीओ भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिल्यानंतर व प्रसारमाध्यमांच्या पुढाकारानंतर आंदोलनकारी राऊत हे झाडावरुन खाली उतरले.
दरम्यान गोरेगावचे बीडीओ दिनेश हरिणखेडे यांनी कमरगाव प्रकरणातील सर्व प्रकरणाची माहीती घटनास्थळी येऊन वरिष्ठांना दिली.सदर मजुर झाडावर चढल्यानंतर एकच हल्ला जि.प.परिसरात माजला.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम,मग्रारोहयोचे बीडीओ नरेश भांडराकर,जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,समाजकल्याण सभापती देवराज वडगाये,जि.प.सदस्य जियालाल पंधरे,विश्वजित डोंगरे यांच्यासह प्रशासनाच्यावतीने अनेकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यांनी कारवाईची मागणी रेटूनच धरली.त्यातच गोरेगावचे बीडीओ दिनेश हरिणखेडे हे सुध्दा दाखल झाले,त्यांनी त्यांच्या प्रकरणातील सर्व माहिती देत थकलेली मजुरी देण्याची हमी दिली ,परंतु मजुर राऊत मात्र बीडीओने टाळाटाळ केल्याचे कारण पुढे कारण कारवाईच्या मागणीवरच अडून राहिले.
सविस्तर असे ती,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कमरगाव येथे २०१२-१३ मध्ये रोपवाटीका व वृक्षलागवडीची कामे करण्यात आली. १३ मे २०१२ ते २३ जून २०१२ पर्यंत कमरगाव येथीलच जिल्हा परिषद प्राथ‘िक शाळेच्या पटांगणात रोपवाटीकेचे काम मजुरांकरवी करण्यात आले. शासकीय नियमानुसार, १४५ रुपये मजुरी मजुरांना द्यायला पाहिजे होती. परंतु, रोजगार सेवक नरेश बिरणवार याने ७८ ते ८० रुपये मजुरी देऊन मजुरांची बोळवण केली. यातही कोणाला अर्धवट मजुरी दिली. तर, ९ महिला व एक पुरूष अशा दहा जणांना मजुरीच दिली नाही. तथापि, आज नाही तर, उद्या केव्हातरी आपल्याला मजुरी मिळेल, या आशेवर दहा मजूर होते. वर्षभर मजुरी मिळण्याची वाट पाहिली. मात्र, मजुरी मिळेना ! त्यामुळे पीडित मजुरांनी गटविकास अधिकाèयांकडे धाव घेतली. त्यांनीही टोलवाटोलवी केली. नंतर ऑनलाइन मस्टर तपासले. त्यात मस्टरवरून १० मजुरांची नावेच गहाळ झाल्याचे दिसले. ज्याअर्थी मजुरांनी कामे केलीत, जुन्या मस्टरवर त्यांची नावे आहेत.मग ऑनलाइन मस्टरवरून नावे गहाळ झालीच कशी? असा प्रश्न मजुरांना पडला. त्यामुळे त्यांनी २०१५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाला एक नव्हे तर, पाच ते सहा वेळा निवेदन देऊन न्यायाची मागणी केली.मार्च २०१६ ला सहायक कामगार आयुक्तांकडे धाव घेतली. मात्र, पदरी निराशाच आली. तथापि, येथील पंचायत समितीत खासदार नाना पटोलेंच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जनता दरबारात लिखीराम राऊत यांनी हा मुद्दा उचलून धरला. तिथेही अपयशच आले. अखेर आज, बुधवारी लिखीराम राऊत यांनी दुपारी १२ च्या जवळपास जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठले.आणि १.४५ वाजेच्या सुमारास परिसरातीलच समोरील झाडावर चढून पूर्ण मजुरी द्या, रोजगार सेवक, गटविकास अधिकाèयांवर कारवाई करा, अशी मागणी करु लागला. त्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली. पोलिस प्रशासन व विभागाच्या अधिकाèयांनी राऊत यांना झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली.मात्र, त्यांनी नकार दिला.राऊत यांच्याभोवती चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.पण तो खाली यायला मात्र तयार नव्हता.