जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

0
9

बुलडाणा,दि.१६(berartimes.com)-:जलसंपदा विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 16 मार्च ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आज 16 मार्च रोजी करण्यात आले. जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन व जलरथाचे पुजन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यकारी अभि‍यंता राजेश हुमणे, कार्यकारी अभि‍यंता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग हेमंत सोळगे, जि.प सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.कोंडावार, कार्यकारी अभि‍यंता ‍जिगाव उपसा सिंचन विभाग एस.व्ही.हजारे, सिंचन मित्रमंडळ नांदुराचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, पाणीवापर महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, पंचायत समि‍ती सभापती तस्लीनाबी रसुलखा आदींसह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.अधीक्षक अभियंता श्री. चौधरी म्हणाले, 22 मार्च या जागतिक जलजागृती जलदिनानिमीत्त जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात 10 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन करुन हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावेत.सप्ताहादरम्यान 19 मार्च रोजी वाटर रन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृव्त स्पर्धा आदी अनुषंगीक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चंद्रकांत साळुंके यांनी केले.