विजेच्या झटक्याने मनोरुग्ण कोसळला

0
13

गोंदिया,दि.२९-येथील नेहरुचौकातील कोपèयात असलेल्या विजेच्या खांबावर चढलेल्या मनोरुग्णा इसमाला विजेचा झटका लागल्याने तो खांबावरुन कोसळल्याची घटना आज (दि.२९) दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास घडली.सदर इसमाला लगेच शेजारीच असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले.त्याच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून तो सुदैवाने बचावला आहे.दरम्यान उपचारानंतर लगेच त्या मनोरुग्ण इसमाने रुग्णालयातून पळही काढला.