पत्रकार मारहाणप्रकरणी जिल्हाधिकारी व एसपींना निवेदन

0
8

गोंदिया,दि.8: शहरातील मुख्य रस्त्यावर शहरातील व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक व रहदारीला होणारा त्रास लक्षात घेऊन नगर परिषद व वाहतूक पोलिसांनी शुक्रवारला (दि.७) अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीला सुरवात केली.या पथकाला चांदणी चौकात कार्यवाही करताना तेथील १५ ते २० व्यापाऱ्यांनी गुंडागर्दी करीत पोलिसांनाच नाही तर अतिक्रमणाचे वृत्तसंकलन व छायाचित्र काढण्यासाठी आलेल्या दैनिक भास्करचे प्रतिनिधी नवीन अग्रवाल यांना ट्रॅक्टरवरून ओढून मारहाण केली.या मारहणप्रकरणात पत्रकारावर ज्या आरोपींनी हल्ला केला त्या सर्वांना महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा अधिनियम जो शुक्रवारलाच महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारीत केला.त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी डाॅ.अभिमन्यू काळे व पोलीस अधिक्षक कलासागर यांना दिलेल्या निवेदनात पत्रकार संघटनानी केली आहे.
श्रमिक पत्रकार संघ गोंदिया,लघुवृ्त्तपत्र संपादक संघ,गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघ व प्रेस ट्रस्ट गोंदियाच्या सयुंक्तवतीने हे निवेदन आज शनिवारला देण्यात आले.निवेदन देतेवेळ प्रा.एच.एच.पारधी,गोपाल अग्रवाल,रवी आर्य,अपुर्व मेठी,हाजी अल्ताफ शेख,दिलीप लिल्हारे,संजय राऊत,हिदायत शेख,चंद्रकात खंडेलवाल,उदय चक्रधर,महेंद्र बिसेन,हरिष मोटघरे,खेमेंद्र कटरे,सावन डोये,प्रमोद नागनाथे,मिलन लिल्हारे,बाबा शेख,संतोष शर्मा,भरत घासले,मुनेश्वर कुकडे,जंयत शुक्ला,नरेंद्र सिंद्राम,अतुल दुबे,राजेश बनसोड आदी पत्रकार उपस्थित होते.