अतिक्रमणधारकांपुढे पालिकेचे लोटागंण; मोहिम थांबली

0
17

नगराध्यक्षाचे सात दिवस,मुख्याधिकाèयाचे २४ तासाचे अल्टीमेटम
गोंदिया,दि.८: शहरात अतिक्रमणाचे जाळे पसरले आहे. त्यामुळे नगर परिषदेने शुक्रवारी जिल्हाधिकाèयांच्या आदेशानेच अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. परंतु, चांदणी चौकात अतिक्रमणधारी व्यापाèयांनी पोलिस कर्मचारी, पत्रकार आणि नगर परिषदेच्या कर्मचाèयांवर हल्ला केल्याने मोहिमच थांबवली गेली.अतिक्रमणधारी व्यापार्यांनी गुंडगर्दी कशी सुरु केली याचे उदाहरणच बघावयास मिळाले.अशा लोकांना घाबरून राजकीय नेते सर्वसामान्यांचे मात्र अतिक्रमण तोडून त्यांना उघड्यावर आणते.अशा राजकीय नेत्याना आणि जे अतिक्रमणधारकांची बाजू घेतात त्यांनाही जनतेने सबक शिकविण्याची वेळ आली आहे,मग ते कुठल्याही पक्षाचे असो.
जिल्हाधिकारी यांनीच शहरातील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते.कांहीनी आत्ता तर गोंदिया नगरपरिषदेच्या अतिक्रमणकत्र्यांना जो बळ मिळत आहे,त्याविरोधातच हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुध्दा केली आहे.नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी व्यापाèयांनी सात दिवसात अतिक्रमण हटवावे, असे म्हटल्याचे बोलले जात असताना मुख्याधिकारी यांनी मात्र २४ तासाचे अल्टीमेटम दिले आहे.एकाच प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील वेळेने समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले.तर दुसरीकडे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अतिक्रमण ताबडतोब हटलेच पाहिजे, असे फर्माण सोडत पोलिस विभागाला जेवढा बंदोबस्त लागेल तेवढा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.त्यामुळे पालिका प्रशासन जिल्हाधिकाèयांचे एैकणार की नगराध्यक्षाचे यावर अतिक्रमणाचे भविष्य टांगून आहे.
शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या वर पोहोचली आहे.याच शहरातील गोरेलाल चौकातील रस्त्यावर व नाल्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे गांधीप्रतिमेकडून गोरेलाल चौकाकडे हाटेल qबदल प्लाझाला जेव्हा आग लागली तेव्हा अग्निशमन गाड्यांना जातांना त्रास सहन झाला होता.विशेष म्हणजे याच मार्गावर शहरातील खुप समाजसेवी आहेत,जे इतरांना समाजसेवेसह अनेक गोष्टींची जाणीव करुन देण्यासाठी नेहमीच पुढे असतात,त्यांनी मात्र आपल्या समोरील नालीवरील अतिक्रमण हटवून हा रस्ता मोकळा करुन देऊ यासाठी कधी पुढाकार घेण्याचे सौजन्य दाखविले नाही.अशा समाजसेवकांनी समाजसेवेचे ढोंगधतुरे बंद करायला पाहिजे.
गांधी प्रतिमा चौक, जयस्तंभ चौक, मनोहर चौक, चांदणी चौक, भाजी बाजार, कपडा लाइन, प्रीतम चौक, लोहा लाइन, नाव्ही लाइन, लेबर चौक यासह इतरही चौकात व्यापाèयांनी मोठी दुकानदारी थाटली आहे. भर रस्त्यावर दुकानातील साहित्य मांडत आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होतोच शिवाय नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे.शारदा वाचनालयाच्या समोरील रस्ता बघितल्यास त्या रस्तावर वाहनांच्या माध्यमातून कुणी अतिक्रण केले,कुणी सामान ठेवून कसा रस्ता अडविला याचे चित्र उगडया डोळ्यानी दिसते,परंतु कुठलाही नगरसेवकच काय आमदार खासदार बोलायला तयार नाही.त्यामुळे गोंदिया शहरातील वाढत्या अतिक्रमणाला पदाधिकारीच प्रोत्साहन देऊन बसल्याने शहर अतिक्रमणाच्या विळख्यात चालला आहे.राज्यात पारदर्शक सरकार भाजपची आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालिकेतील पदाधिकाèयांना सत्तेची लालसा न बाळगता आधी मोठ्यांचे अतिक्रमण हटवा याचे आदेश देत अधिकारी ,कर्मचारी वर्गाची बाजू मुख्यमंत्र्यांनी सांभाळून घेतली तर नालीवर बांधकाम करुन पायèया तयार करणाèया लोकप्रतिनिधींच्या घराचेही अतिक्रमण तोडले जाऊ शकते यासाठी फक्त भाजपच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास मात्र हवा.