गोरेलाल चौकातील यात्री लॉजवर छापा, आठ संशयित ताब्यात

0
19

गोंदिया,दि.१० : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या गोरेलाल चौकातील यात्री सुविधा लॉजवर आज सोमवारला शहर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी चार तरूण, दोन तरूणी व दोन महिला अशा आठ जणांना चौकशीकरिता ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (दि.१०) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली.दरम्यान ही लाॅज गेल्या दोन वर्षापासून सुरु असून कुठल्याही प्रकारची नोंद व कागदपत्र नसल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.विशेष म्हणजे मुख्यरस्त्यावर या लाॅजचे फलक लावलेले नसून ती आतमध्ये आहे.
शहर पोलिस ठाण्याच्या २०० फूट अंतरावर यात्रा सुविधा लॉज आहे. हे लॉज सोमवारी चार तरूण, दोन तरूणी व दोन महिलांनी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र न दाखवता बूक केले. आठही जण लॉजमध्ये संशयास्पदरित्या असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला परिसरातीलच काही दुकानदाराकडून मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. या वेळी आठही जणांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले. लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती. त्यामुळे आरोपींची नावे कळू शकली नाही.मात्र आमगाव तालुक्यातील एका गावठी डाॅक्टराचा यात समावेश असल्याचा बोलले जात आहे.सोबतच पकडलेल्या महिलेमध्ये दोन विवाहित असून त्यांचे पती हे कामानिमित्त गावाबाहेर राहत असल्याची चर्चा पोलिस ठाण्यात होती.