पेरकाभट्टी जंगलात पोलिस-नक्षल चकमक, शस्त्रांसह अन्य साहित्य जप्त

0
12

गडचिरोली,दि.११: अहेरी तालुक्यातील देचलीपेठा उपपोलिस ठाण्यांतर्गत पेरकाभट्टी येथील जंगलात काल(दि.१०)रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीनंतर पोलिसांनी नक्षल्यांची शस्त्रे व अन्य साहित्य घटनास्थळावरुन ताब्यात घेतले आहे.काल रात्री सी-६० पथकाचे जवान पेरकाभट्टी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करताच नक्षलवादी त्यांच्याकडील साहित्य घटनास्थळावर टाकून जंगलात पसार झाले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन १ क्लेमोर माईन, १ बारा बोर रायफल, काही पिट्टू, पुस्तके, औषध व दैनंदिन वापराचे साहित्य ताब्यात घेतले. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.