डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी: कल्पना भोयर

0
18

लाखनी, ता.14- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती लिटील फ्लावर इंग्लिश स्कुल लाखनी येथे साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, समाजातील विविध घटकांच्या उत्थानासाठी बाबासाहेबांचं कार्य हे महान आहे. त्यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत महत्वाचे योगदान दिलेले आहे,असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्या कल्पना भोयर यांनी केलं. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सोबतच पर्यवेक्षक आशीष बडगे, सहा.शिक्षक प्रशांत वाघाये प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. अत्यंत खडतर आणि कठीन परिस्थितीत देखील त्यांनी उच्चशिक्षण घेतलं आणि त्याचा उपयोग या देशाला खऱ्या अर्थाने घडवण्यासाठी केला. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे. बाबासाहेब हे भारतातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक चळवळींचे प्रणेते होते. समता, बंधुता व स्वातंत्र्य’ या तत्त्वांवर नवसमाजनिर्मिती करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. जातीव्यवस्थेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर अविचलपणे मुक्तीसंग्राम केला. शोषित, वंचित समाजाचे उद्धारकर्ता म्हणून इतिहासात त्यांचे स्थान अढळ राहणार आहे. असे प्रतिपादन यावेळी प्रशांत वाघाये यांनी केले. कु. श्रुती कोळवते या विद्यार्थीनीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर सुंदर भाषण दिले तसेच सहा.शिक्षिका विद्या फरांडे यांनी एक सुंदर गीत सादर केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया बावानकुळे तर आभार विशाल हटवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी नुसरत शेख, अंजली कानतोडे, पुष्पा मानकर, शुभांगी झलके यांनी सहकार्य केले.