मेहकरात काँग्रेसने दिले तहसिलदारांना निवेदन

0
11

मेहकर,दि.21-बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकर्य़ांच्या मागण्यांना घेऊन आज शु्क्रवारला(दि.21) धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानंतर तहसिलदांराना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शेतकऱ्याचे तूरीचा माल नाफेडद्वारा खरेदी करताना काही ठराविक व्यापाराशी संगनमत करून 7/12 चे शेतसारे जमा करून खरेदी केली जाते त्यावर आळा घालण्य़ात यावे. बोगस शेतकऱ्याच्या नावाने 200, ते 500 पोते माल विकल्या गेले त्याची चौकशी करुन दोषीला कडक शिक्षा करण्यात यावे. नाफेडला खरेदीची मुदत वाढ करून द्यावी, शेतकऱ्याजवळ असलेला संपूर्ण तुरीचा माल शासनाने खरीदी करावा या मागण्यांचा समावेश होता. निवेदन देतेवेळी श्यामभाऊ उमाळकर,लक्ष्मण दादा घुमरे, देवानंद पवार, अनंतराव वानखडे, नाजीमभाई कुरेशी, दीपक आखाडे, विनोद प-हाड ,विनायक टाले,कालिम खान,भरत आल्हाट, शैलेश बावस्कर, निलेश मानवतकर, निलेश सावजी, वामन मोरे,प्रदीप देशमुख ,संतोष शेळके ,विश्वास दुतोंडे, सैयद नजिर, कैलास आडे, बंटी शिंदे, सोनू इनकर, विशाल ठाकरे ,किशोर अडेलकर, तुकाराम चव्हाण इ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.