अवैध होर्डींग व पोस्टर्स नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

0
20

गोंदिया,दि.२७ : अवैध होर्डींग, पोस्टर्स, आरचेस, जाहिराती आदी तक्रारी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषद/नगरपंचायत निहाय पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, दूरध्वनी (०७१८२) २३५९३५, मो.७७७४९०९७७७, ई-मेल [email protected], नगरपरिषद/नगरपंचायत गोंदिया, गोंदिया शहर व रामनगर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र. तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड, दूरध्वनी (०७१९८) २५३२३०, मो.९९२२४०५८८२, ई-मेल [email protected], नगरपरिषद/नगरपंचायत तिरोडा, तिरोडा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र. देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, दूरध्वनी (०७१८९) २२६३२३, मो.९८६०६३८७३६, ई-मेल [email protected], नगरपरिषद/नगरपंचायत गोरेगाव, देवरी, अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी. गोरेगाव, देवरी, अर्जुनी/मोरगाव व डुग्गीपार पोलीस स्टेशन हे कार्यक्षेत्र आहे.
नगर परिषदेकडून प्राप्त तक्रारींची ठाणेदार यांनी वेळीच दखल न घेतल्यास किंवा त्यांना सहकार्य न केल्यास नोडल अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करावी. असे पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी कळविले आहे.