अतिक्रमणमुक्त शहरासाठी सयुंक्त कठोर कारवाई होणार-नगराध्यक्ष इंगळे

0
8

गोंदिया,दि.27- शहराला अतिक्रमणमुक्त करणे ही नगरपरिषदेची पहिली प्राथमिकता आहे,ज्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करुन दुकाने तयार केली असतील qकवा रस्ते व नाल्यावर आपले दुकाने काढली असतील अशा सर्वांना त्यांनी स्वतःकेलेले अतिक्रमण कारवाई आधीच काढून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.जे काढणार नाही,qकवा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणार नाही त्या सर्वांचे स्थायी अस्थायी अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच सयुंक्त अतिक्रमण हटाव कठोर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी बेरार टाईम्स शी बोलतांना दिली.

नगराध्यक्ष इंगळे म्हणाले की गेल्या पंधरवाड्यात अतिक्रमण हटाव मोहीम राबवितांना जे काही घडले ते अनुचित होते.तसे भविष्यातही होऊ नये.गोंदिया शहरातील बाजार परिसर जो मुख्यःमार्केट आहे,त्यामध्ये भाजीबाजार,गोरेलाल चौक,चांदणी चौैक,श्री टॉकीज रोड,दुर्गा चौक,शहर पोलिस स्टेशन समोरील किराणा दुकान लाईन यामध्ये रस्त्यावर अतिक्रमण आलेले आहे.हे अतिक्रमण हटविण्यासाठी जनतेचा विशेष करुन महिलांचा मोठा दबाव नगरपरिषद प्रशासनावर येत आहे.गोंदिया शहराला अतिक्रमणमुक्त करुन रहदाèयांना मोकळा श्वास घेऊ द्या असे संदेश महिलांचे येत असल्याने नागरिक कुठल्याही परिस्थितीत अतिक्रमण स्विकारायला तयार नसल्याचे सांगितले.त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक झाली असून येत्या काही दिवसात महसुल विभाग,पोलिस विभाग,भूमिअभिलेख विभाग व नगरपरिषद सयुंक्त कारवाई करणार आहे.या कारवाईत सरळ अतिक्रमीत दुकाने असो की घर हे तोडले जाणार आहे,त्यासाठी प्रशासन पुर्ण सज्ज झालेला आहे.गोंदिया शहराला सुंदर करण्यासाठी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जे अधिकारी पाहिजे ते मिळतील मात्र शहरातील अतिक्रणाची घाण दूर करण्याचे निर्देश देत या मोहीमेत राज्यसरकार पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नगरपरिषद प्रशासनाला दिल्याची माहिती इंगळे यांनी दिली.अतिक्रमणाची कारवाई ही कायदेशीररित्याच होणार आहे.त्यात ज्यांनी अतिक्रमण करुन रस्ते,नाल्या व इतर संपती गिळकृंत केली त्यांनी त्वरीत आपले अतिक्रमण स्वत कारवाई आधीच काढल्यास योग्य होईल अन्यथा कारवाईसाठी लागणारा खर्च सुध्दा संबधित दुकानदार व घरमालकाकडून कायदेशीररित्या वसुल करण्याची तरतूद सुद्दा करण्यात येईल अशी भूमिका नगराध्यक्षांनी घेतली असून अतिक्रमणधारक कुठल्याही पक्षाचा असो त्यांच्या दबावाला आता प्रशासन बळी पडणार नसल्याचे सांगितले.