कु स्नेहल भागवत पदव्युत्त़र शिक्षणासाठी ईटलीला रवाना

0
15

गोंदिया,,दि.२७ :- कु स्नेहल गौतम भागवत या नुकतेच पदव्युत्त़र शिक्षण घेण्यासाठी फ्लोरेन्स़, ईटली येथे रवाना झाल्या आहेत. पुणे येथुन प्रतिष्ठीत सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्च़र येथुन इंटेरिअर डिझायनिंग ( आर्किटेक्च़र) मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांचा दाखला फ्लोरेन्स़, ईटली मध्ये असलेल्या जगविख्यात संस्था फ्लोरेन्स़ इन्स्टिट्युट ऑफ डिझाइन इंटरनॅशनल या शिक्षण संस्थेत इंटेरिअर डिझायनिंग मध्ये एक वर्षासाठी पदव्युत्त़र शिक्षण घेण्यास झाला आहे.
कु स्नेहल या गोंदिया मंडळ कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता गौतम भागवत यांची सुकन्या आहे. कु स्नेहल यांनी आपल्या यशाचे श्रेय महावितरण गोंदिया परिमंडळाचे मुख्यं अभियंता  जे एम पारधी, गोंदिया मंडळाचे अधिक्षक अभियंता एल एम बोरीकर, सुप्रसिद्ध साहित्यकार लोकनाथ यशवंत, त्यांचे वडिल व गोंदिया मंडळाचे उप कार्यकारी अभियंता गौतम भागवत, आई अनुराधा भागवत, भाउ अविनाश व बहिण संजना यांना दिले आहे. कु स्नेहल या २०१६ मध्ये औरंगाबाद येथिल एम जी एम कॉलेज मध्ये आर्किटेक्च़र च्या व्खाख्यता सुद्धा होत्या.