रेल्वेमंत्र्याच्या हस्ते वडसा-गडचिरोली रेल्वेलाईनचे भूमिपूजन

0
12

नागपूर,दि.०९: बहुप्रतीक्षित असलेल्या वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे ऑनलाईन भूमिपूजन मंगळवारला(दि.९) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नागपुर येथे आयोजित रेल्वेस्थानकावरील कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी नागपूर-पूणे व अमरावती -पुणे नव्या रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकळे,आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम,खासदार अशोक नेते,खासदार कृपाल तुमाने,आमदार अनिल सोले,सुधाकर कोहळे,नागपूरच्या महापौर नंदाताई जिचकार,खासदार रामदास तडस,खासदार अजय संचेती यांच्यासह मध्य पुर्व दक्षिण रेल्वेचे व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुनील qसह सोईन,डी.के.शर्मा,अमितकुमार मंडल,ब्रिजेश गुप्ता आदी अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली-वडसा नव्या रेल्वेमार्गाच्या कोनशिलेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.या मार्गावर ८ स्टेशन राहणार असून गडचिरोलीचे स्टेशन हे टर्मिनल स्टेशन राहणार आहे.यावेळी कलमना गोधनी कार्ड केबीन लाईन,मोतीबाग येथे डब्बे दुरुस्ती केंद्र व इतवारीत कोच डेपो सुविधेचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.