कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होणार-खा.पटोले

0
21

गोंदिया,दि.०९-जिल्ह्यात सुरु असलेल्या भारनियमनामुळे हाती आलेले पिक थोड्या पाण्याअभावी हातचे जाण्याची शक्यता वाढली आहे.त्यामुळे शेतकèयांचे मोठे नुकसान होण्याची चित्रे दिसून आल्याने खासदार नाना पटोले यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकèयांच्या विद्युतपंपाना लागणाèया विद्युत भारनियमनाच्या प्रश्नावर चर्चा केली.पटोले यांनी मांडलेल्या विषयाचे गांभिर्य लक्षात घेत शेतीसाठी विज पुरवठा पुर्ववत करण्याचे आदेश महावितरणला लगेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती पटोले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. काही ठिकाणी १६ ते १२ तासाचे भारनियमन सुरु होते.जिल्ह्यातील शेतकèयांचे पीक पाण्याअभावी जाण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर ९ मे रोजी पटोले यांनी वास्तविक चित्र मुख्यमंत्र्यांसमोर ठेवत विजेचे भारनियमन बंद करण्याची मागणी केली होती,त्या मागणीला मुख्यमंत्र्यानी होकार दिल्याने भारनियमनापासून शेतकèयांना मुक्ती मिळणार आहे.