अस्तित्त्वात नसलेल्या भूखंडाची विक्री; आरोपीला अटक करण्याची मागणी

0
12
गोंदिया दि.15 : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रिंगरोड बायपास मार्गावरील दोसाहट जवळ लागून असलेला एक भूखंड अभियंता विवेक मिश्रा याने फिर्यादीला विकला. भुखंड घेतल्यानंतर सदर भूखंड त्या ठिकाणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावर फिर्यादी राजेंद्र सहेषराम पटले रा. तुमसर यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा ११ एप्रिल रोजी पोलिसांनी दाखल केला. मात्र महिना लोटूनही अद्यापही आरोपीला अटक झाली नसून आरोपीला अटक करून आपल्या न्याय द्यावा अशी मागणी विश्राम गृह येथे आयोजित पत्र परिषदेत राजेंद्र पटले यांनी केली आहे.
रामनगर पोलिस ठाण्याहद्दीतील मजार समोरील रिंगरोडवरील Þदोसाहट जवळ राजेंद्र पटले यांनी अभियंता विवेक मिश्रा यांच्याकडून एक भूखंड घेतला होता. या भूखंडाची रितसर रजिस्ट्रीही झाली. रजिस्ट्री झाल्यानंतर सदर भूखंडाची ताबा घेण्यासाठी पटले गेले असता हा भूखंड दुसNयाच्याच नावावर असल्याचे दिसून आले. तसेच या भुखंडावर वन विभागाचे सेवा निवृत्त अधिकारी अश्विन ठक्कर यांनी या जागेवर अतिक्रमण केल्याचे दिसून आले. या बाबत पटले यांनी मिश्रा यांना सदर बाब लक्षात आणून दिली. तसेच भूखंड खरेदीचे दिलेले पैसे अथवा भूखंड देण्याची मागणी केली. मात्र, मिश्रा यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे भूखंड खरेदीत आपली शुद्ध फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार ११ एप्रिल रोजी दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून अभियंता मिश्रा यांच्यावर कलम ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र अद्यापही आरोपी मिश्रा वर कोणतेही कारवाई पोलिसांनी केलेली नाही, याउलट या भुखंडाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचेही पटले यांनी आयोजित पत्र परिषदेत सांगितले. तसेच प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा या विषयाला घेऊन आंदोलनात्मक भुमिका घ्यावा लागेल, अशा इशाराही पटले यांनी आयोजित पत्र परिषदेत दिला.