उष्माघाताने रेंगेपार दल्ली येथे महिलेचा मृत्यू

0
9

गोंदिया,दि.२१-सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रार्तंगत येत असलेल्या रेंगेपार(दल्ली)येथील महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना आज रविवारला घडली.सदर मृत महिलेचे नाव प्रमिला चंद्रभान कुसाम असे आहे.सदर महिला आज सकाळीच आपल्या शेतातील रब्बीपिकाचे धान कापणीसाठी गेली होती.शेतातून घरी परतल्यावर जनावरांना चारा पाणी केल्यानंतर घरात जाऊन पाणी मागितले.पाणी पित असतानाच त्यांचा मृत्यू झाला.ताबडतोब १०८ रुग्णवाहिका सामाजिक कार्यकर्ते विलास कापगते यांनी बोलावले.परंतु अंबुलस पोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.डॉक्टरांनी घरीच तपासणी केल्यानंतर मृत्यू झाल्याचे घोषीत केले.त्यांच्यावर आज गावातील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.