ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; चार ठार

0
17

वर्धा, दि. 28  – नागपूर – चंद्रपूर महामार्गावरील जाम नजीक दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.

एम.एच.४९ जे. ८५१५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स हिंगणघाटकडे प्रवासी घेवून जात होती. दरम्यान जाम लगतच्या शेडगाव चौरस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्ता दुभाजकावर आदळून रस्त्याच्या कडेला उलटल्या गेली. यात दुचाकीवर असलेल्या दोघांना ट्रॅव्हल्सने चिरडले तर ट्रॅव्हल्समधील वाहक व एक प्रवासी ट्रॅव्हल्सखाली दबल्या गेला. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर व जाम पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले