करकेवाडा येथील नक्षल शिबिर उद्ध्वस्त

0
8

गडचिरोली,दि.२७: विशेष अभियान पथकाच्या जवानांनी आज भामरागड तालुक्यातील करकेवाडा जंगलात सुरु असलेले नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त करुन मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.आज विशेष अभियान पथकाचे जवान महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील करकेवाडा जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावर पाहणी केली असता तेथे नक्षलवादी वापरत असलेले औषध, दैनंदिन वापराचे साहित्य, पुस्तके आढळून आली. पोलिसांनी हे साहित्य ताब्यात घेतले.काल भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील दर्भा जंगलात पोलिस-नक्षल चकमक झाली होती.