वादळीवार्यासह पावसाची हजेरी :शहर अंधारात

0
13

गोंदिया,दि.२८- गोंदिया शहरासह ग्रामीण भागात आज  सायंकाळी सहा वाजेपासून वादळीवार्यासह पावसाने हजेरी लावली.वार्यामुळे शहरासह खेड्यातील वीज पुरवठा खंडीत झाला असून अद्यापही सुरळीत झालेला नाही.त्यातच गोंदिया रेल्वेस्थानकावरील प्लेटफार्मवरील टिनाचे पत्रेही उडाली.झाडे सुध्दा पडली आहे.नागपूरात सुध्दा पावसाने हजेरी लावली असून तिथेही विज पुरवठा खंडीत झालेला आहे.