नागेपल्ली येथील अपघातात एक जण जागीच ठार

0
14

आलापल्ली, दि. 29  :-नागपूरवरून अहेरीकडे येणाऱ्या बसने नागेपल्ली येथील सेवा सदन हाॅस्पिटलजवळ इसमास दिलेल्या धडकेत इसम ठार झाल्याची घटना काल २८ मे रोजी रात्री १०. ३० वाजताच्या सुमारास घडली.सॅमसन राजन्ना कोयडवार (४०) रा. नागेपल्ली असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार नागपूर आगाराची बस क्रमांक एमएच ४० वाय ५१४६ ही नागपूर येथे अहेरीकडे येत होती. रात्री १०. ३० वाजताच्या सुमारास या बसने सॅमसन कोयडवार याला जबर धडक दिली. धडकेनंतर बसचालक प्रामाणिक गणपत डंभारे याने त्याला सेवासदन हाॅस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत भरती करण्यासाठी नेत होता. यावेळी त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अहेरी पोलिसांनी बसचालक प्रामाणिक गणपत डंभारे याला अटक करून भादंवी ३०४, २७९ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार लक्ष्मण मोहुर्ले करीत आहेत.