स्व. फाल्गुणराव पटोले स्मृती पुरस्काराने बीडीओ जमाईवार सन्मानित

0
14
अर्जुनी-मोर,दि.09- कृषी क्षेत्रात राष्ट्रहितार्थ केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल व ग्रामविकासात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल अर्जुनी-मोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण प्रसाद जमाईवार यांना स्व. फाल्गुणराव पटोले कृषी मित्र व ग्रामविकास मित्र पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.
हा पुरस्कार भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. नाना पटोले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते सुकळी येथील कार्यक्रमात ५ जून रोजी प्रदान करण्यात आला. यावेळी गोंदिया जि.प. च्या उपाध्यक्षा रचना गहाणे, सभापती छाया दसरे, सविता पुराम, प्रकाश बाळबुद्धे, नितीन पोहणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कर्तव्यदक्ष, गटविकास अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त असलेले नारायण प्रसाद जमाईवार यांनी ग्रामविकासामध्ये अर्जुनी-मोर पंचायत समितीला केंद्र पुरस्कृत राज्यस्तरावर पंचायत सशक्तीकरण हा २५ लाखाचा पुरस्कार मिळवून देवून अर्जुनी-मोर तालुक्याचे नाव लौकीक करण्यात त्यांचा qसहाचा वाटा आहे. सोबतच तालुक्यात शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना यशस्वीपणे राबविणे, प्रत्येक योजनांची माहिती प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहचविणे व योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळावा यासाठी त्यांची धडपड असते. कर्मचाèयांवर वचक शिस्त व नियंत्रण तथा कामात पारदर्शकता हे या कर्तव्यदक्ष अधिकाèयाचे वैशिष्ट आहे. जमाईवार यांची कार्यकुशलता पाहून या विभागाचे लोकप्रिय खा. नाना पटोले यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली व आपले वडील स्व. फाल्गुणराव पटोले कृषी व ग्रामविकास पुरस्कार त्यांना बहाल केला. बीडीओ नारायण प्रसाद जमाईवार यांना हा पुरस्कार प्रदान झाल्याचे सभापती अरqवद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे तथा सर्व पं.स. सदस्य, सर्व जि.प. सदस्य, राजू पालीवाल, अशोक चांडक, मुन्ना शुक्ला, सर्व पं.स. स्तरावरील कर्मचारी, अधिकारी, सरपंच व उपसरंपच यांनी अभिनंदन केले.