महालगाव आरोग्य केंद्राचे लोकार्पण

0
11

गोंदिया,दि.10- जिल्हा परिषदेच्या  राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या महालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण ०९ जूनला तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती पी.जी.कटरे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून  महिला व बालकल्याण सभापती विमल नागपूरे, डा.चिंतामण रहांगडाले, डाॅ. वसंत भगत,तालुका आरोग्य अधिकारी डा.चौरागडे, प.स.सदस्य माधुरीताई हरीनखेडे,निताताई पटले,विनाताई टेंभरे, सरपंच जितेंद्रसिंह नैकाने,श्री दसाराम आगाशे,माजी जि.प.सदस्य अर्जुन नागपूरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार रहागंडाले यांनी आरोग्य केंद्राचा लाभ परिसरातील गावांना योग्यरित्या करुन देण्याची जबाबदारी येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची असून सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु होत असल्याने केंद्रात आलेल्या प्रत्येक रुग्णावर योग्य उपचार करुन परिसर आरोग्य विभागाने सृदृढ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावे असे आवाहन केले.तसेच पी.जी.कटरे यांनी या केंद्रात कर्मचारी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली असून सर्वांनी मुख्यालयी राहून आरोग्यसेवा द्यावे असे सांगत पुढेही जिल्हा परिषद प्रशासन आरोग्य केंद्राला सहकार्य करीत राहील असे आश्वासन दिले.संचालन व पाहुण्यांचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे उपअभियंता सुनिल तरोणे यांनी केले.