एमआयटीच्या प्राचार्य पांडेची उकेने केली धुलाई

0
8

गोंदिया,दि.07- गोंदिया शिक्षण संस्थेतंर्गत येत असलेल्या कुडवा येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरासाठी नेमलेल्या खासगी सुरक्षा रक्षकाने आपल्या थकीत वेतनाला घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र पांडे यांची चांगलीच धुलाई त्यांच्याच कार्यालयात केली.हे महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचे असून माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या चिरंजिवाकडे सध्या गोंदिया शिक्षण संस्थेच्या कामाची देखरेख देण्यात आली आहे.त्यातच ज्या खासगी सुरक्षा रक्षकांने मारहाण केली ते रमण उके हे गोंदिया नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवार होते.त्यांचा त्या निवडणुकीतही पराभव झाला होता.

कुडवा स्थित अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी खासगी सुरक्षा रक्षक एंजसी नेमण्यात आली होती.शिक्षण संस्थेने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून उके यांच्या संस्थेला हे काम दिले होते.परंतु प्राचार्य पांडे यांनी गेल्या अनेक महिन्यापासून सुरक्षा रक्षक एंजसीचे पैसे देण्यास टाळाटाळ केली तरीही शिक्षण संस्थेचे काम बघणारे तथाकथितांनी त्याकडे दुर्लक्ष केले.अशा तथाकथितांनी केलेल्या चुकीचा मोबदला मात्र खासदार पटेलांना निवडणुकीतून मोजावे लागते.प्राचार्य पांडे यांच्या या प्रतापामुळे गोंदिया शिक्षण संस्थेची व प्रफुल पटेलांची प्रतिमा सुध्दा धुळीस मिळाली आहे जेव्हा की जे स्थानिक सुत्रे हातात घेऊन बसले त्यांची नव्हे अशी चर्चा आजच्या प्रकारानंतर पुन्हा चर्चेत आली आहे.याप्रकरणी रामनगर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.उके यांनी त्यांच्या मित्राच्या दुकानात पांडे आले असतानाही मारहाण केली आहे.घटना महाविद्यालयातील नसली तरी महाविद्यालयाची प्रतिमा पांडे यांच्या कार्यप्रणालीमुळे सुध्दा लयास गेली.सध्या गोंदिया शिक्षण संस्थेतर्गंत येत असलेले सर्वच शिक्षक ,प्राध्यापक व कर्मचारी मोठ्याप्रमाणात व्यवस्थापनाकडून दुखी असल्याची चर्चा आहे.खा.पटेलाना बघून काही कर्मचारी व प्राध्यापक गुपचूप एका लहानश्या ज्याला अनूभव नाही त्याच्या शिव्या सुध्दा एैकाव्या लागत असल्याचे या घटनेनंतर समोर आले असून या सर्व प्रकरणाचा फटका पटेलांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.