शेतकर्यांना बैलबंडीचे वितरण

0
13

चिमूर,दि.08-चिमूर पंचायत समितीच्यावतीने विशेष घटक योजनेतंर्गत शेतकर्यांना बैलबंडीचे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून शेतकर्यांना त्याचा लाभ मिळेल असे विचार पंचायत समितीचे सदस्य रोशन ढोक यांनी केले.ते पंचायत समितीच्या कार्यालयात विशेष घटक योजनेतंर्गत बैलबंडी वितरणप्रसंगी बोलत होते.यापुढे बैलबंडी वितरणाचे अनुदान सरळ शेतकर्याच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने त्यांची पायपीठ थांबणार असेही सांगितले.यावेळी पंचायत समितीच्या सभापती विद्या चौधरी,उपसभापती शांताराम सेलवतकर,पंचायत समिती सदस्य प्रदीप कामडी,कृषी अधिकारी पसारे , घनश्याम रामटेके लाभार्थी उपस्थित होते.